औरंगाबाद - पनीरच्या कोणत्याही रेसिपीचे नाव ऐकताच छोट्यांसह मोठ्यांच्या तोंडात पाणी येऊ लागते. तुम्हाला घरी हाॅटेलसारखं पनीर बटर मसाला बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. तेही बिना कांदा आणि लसूणाची. ती शाकाहारी लोकांसाठी खूपच चांगली डिश आहे. तर चला पनीर बटर मसाल्याची रेसिपी Paneer Butter Masala Recipe In Marathi जाणून घेऊ या...
टीप्स
- पनीर बटर मसाला उपवासालाही चालते. फक्त उपवासाला वर्ज्य असलेले पदार्थ त्यात टाकू नका.
साहित्य
- पनीर - ४०० ग्रॅम
- काजू - १/२
- टोमॅटो - १ कप
- हिरवी मिरची - तीन
- अद्रक - २ छोटे चमचे
- जीरा - दोन चमचे
- लाल शिमला मिरची/ काश्मिरी लाल मिरची - १ छोटा चमचा
- क्रश इलायची - ४
- कसुरी मेथी - १ मोठा चमचा
- दूध - १ कप
- बटर/तूप/तेल - २-३ मोठे चमचे
- गाळण्यासाठी पाणी - 1/2 कप
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर आवश्यकतेनुसार
कृती
- काजू, कापलेले टोमॅटो आणि १/२ कप पाण्याल बारीक होईपर्यंत हटा
- नंतर एका कढईत तेल टाकून त्यात जीरा टाका आणि तडका येऊ द्या त्याला.
- त्यात बारीक केलेली इलायची, अद्रक आणि हिरवी मिरचीचे पेस्ट टाका.
- मग टोमॅटो-काजूचे पेस्ट टाका आणि काही मिनिटांपर्यंत चालू ठेवा.
- पुन्हा त्यात काळी मिरची आणि कसूरी मेथी टाका.
- दूध टाका आणि उकळी येऊ द्या. त्यात पनीरचे तुकडे टाका.
- हाॅटेलसारखे पनीर बटर मसाला तयार झाले. ते तुम्ही रोटी, नान किंवा भाताबरोबर खाऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.