Boondi Recipe: घरीच बनवा 10 मिनिटांत गोड रसरशीत बुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी

गोड बुंदी घरी कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत.
Boondi Recipe
Boondi Recipesakal
Updated on

जर तुम्ही पारंपारिक भारतीय मिठाईचे चाहते असाल तर हे गोड बुंदी घरच्या-घरी कशी तयार करायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मिठाई, मोतीचूर लाडू किंवा जिलेबी हे सर्व वयोगटातील लोकांना आवडतात.

गोड बुंदी घरच्या-घरी कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडला असेल, तर स्टेप बाय स्टेप झटपट आणि सोपी गोड बंदीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बुंदी कशी बनवायची

  • गोड आणि रसाळ बुंदी बनवण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार करा. एका पातेल्यात पाणी घाला आणि उकळी येऊ द्या.

  • पाणी उकळू लागल्यावर त्यात साखर, वेलची ठेचून केशर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळली की मंद आचेवर ठेवा.

  • बुंदीसाठी पाक गुलाब जामुन सारखाच असावा. यानंतर बुंदी बनवण्याची तयारी करा. चाळलेले बेसन एका मोठ्या भांड्यात घ्या. यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा.

Boondi Recipe
Madhuri Dixit Hair Mask Tips : पावसाळ्यातही माधुरीसारखे हेल्दी, शायनी अन् दाट केस हवेत? हे घ्या तिचं सिक्रेट
  • आता भांड्यात थोडे थोडे पाणी घालून एका दिशेने मिसळा. चांगली कंसिस्टेंसी होण्यासाठी 15 मिनिटे फेटून घ्या. लक्षात ठेवा की ते खूप पातळ नसावे आणि जास्त जाड नसावे. यानंतर त्यात फूड कलरचे 2-3 थेंब टाका आणि पुन्हा मिसळा.

  • एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करून नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा.

  • बुंदीचा झारा तेलावर ३-४ इंच वर धरून त्यावर पीठ ओतून पसरा.

Boondi Recipe
Healthy Fats Benefits निरोगी राहायचं असेल तर डाएटमध्ये हेल्दी फॅट्सचा करा समावेश, ऋजुता दिवेकरने सांगितले फायदे
  • पीठ आपोआप झाऱ्यातून तेलात पडले पाहिजे. नाही तर बुंदी योग्य आकारात पडत नाही.

  • पीठ तेलात पडायचे थांबल्यावर झारा बाजूला करून घ्यावे. नंतर बुंदी तळून घ्यावी.

  • नंतर झारा पुन्हा वापरण्यापूर्वी कागदाने किंवा फडक्याने कोरडा करून घ्यावा. बुंदी गुलाबीसर दिसेपर्यंत तळून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.