Malai Boti Kebab : घरच्या घरी तयार करा बार्बेक्यू मलाई बोटी कबाब

मटणापासून तयार केलेल्या एका रेसिपीला मलाई बोटी कबाब म्हणतात.
Malai Boti Kebab
Malai Boti KebabEsakal
Updated on

मटणापासून तयार केलेल्या एका रेसिपीला मलाई बोटी कबाब म्हणतात. या पदार्थात मसाल्यांची चव क्रीमसह बॅलेंस केली जाते, जी त्याची चव वाढवण्याचे काम करते. स्नॅक म्हणुन खायलाही स्वादिष्ट आहे. चला तर मग आज आपण बघू या घरच्या घरी मलाई बोटी कबाब कसे तयार करायचे याची स्पेशल रेसिपी..


साहित्य

● अर्धा कप कच्ची पपई

● दोन चार हिरव्या मिरच्या

● एक आल्याचा तुकडा चिरलेला

● लसूण पाकळ्या

● एक चमचा लिंबाचा रस

● अर्धा किलो मटण

● अर्धा कप दही

● अर्धा कप मलई

● वेलची पावडर

● काळी मिरी पावडर

● पांढरी मिरी पावडर

● जिरे पावडर

Malai Boti Kebab
Paneer Samosa recipe: घरच्या घरी कसा तयार करायचा पनीर समोसे?

कृती:

बार्बेक्यू मलाई बोटी बनवण्यासाठी प्रथम कच्ची पपई, हिरवी मिरची, आले, लसूणाच्या पाकळ्या आणि लिंबाचा रस ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता मटण घ्या, त्यात हे मिश्रण घाला आणि चांगले मिक्स करा. 30 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवा. याशिवाय आता तुम्ही मटण इतर प्रकारेही मॅरीनेट करू शकता. यासाठी दही, क्रीम, वेलची पावडर, काळी मिरी पावडर, पांढरी मिरी, जिरेपूड, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून मटणाबरोबर सर्व गोष्टी नीट मिक्स करा आणि 2 ते 3 तास मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.

मॅरीनेट केलेले मटण स्क्यूअरमध्ये ठेवा आणि कोळशाच्या आचेवर चांगले ग्रील करा आणि तुमच्या आवडत्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.