Green Chili Benefits: झणझणीत हिरव्या मिरचीचे फायदे ऐकून व्हाल थक्क, तिखट मिरचीचे आरोग्यासाठी फायदे

हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिरव्या मिरचीमध्ये Green Chili असलेली अनेक पोषक तत्व आरोग्यासाठी Health लाभदायक असून यामुळे अनेक आजार दूर होतात
हिरव्या मिरचीचे फायदे
हिरव्या मिरचीचे फायदेEsakal
Updated on

तिखट हिरव्या मिरचीमुळे Green Chili जेवणाची चव वाढते. पदार्थ रुचकर आणि स्वादिस्ट बनवण्यासाठी हिरवी मिरची महत्वाची ठरते. पण तुम्हाला माहित आहे का? चवीला तिखट झणझणीत असलेली हिरवी मिरची ही तुमच्या आरोग्यासाठी Health फायदेखील आहे. Marath Health Tips Green Chili Benefits to Human Body

होय हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हिरव्या मिरचीमध्ये Green Chili असलेली अनेक पोषक तत्व आरोग्यासाठी Health लाभदायक असून यामुळे अनेक आजार दूर होतात. हिरव्या मिरचीमध्ये कॉपर, प्रोटीन, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट उपलब्ध असतात.

जाणून घेऊयात मिरचीच्या सेवनामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या दूर होतात.

निरोगी हृदयासाठी- हिरव्या मिरचीचं सेवन ह्दयाच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. हिरव्या मिरचीच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते. हिरव्या मिरचीतील गुणधर्मांमुले रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो. ज्यामुळे हृदय विकाराचा धोका टळतो.

ब्लड शुगर राहते नियंत्रणात- मधुमेही रुग्णांसाठी मिरचीचं नियमित सेवन फायदेशीर ठरु शकतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका दूर – हिरव्या मिरचीच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. हिरव्या मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या पेशी वाढवणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून तुमच्या शरीराचं संरक्षण करतात.

हे देखिल वाचा-

हिरव्या मिरचीचे फायदे
असं बनवा लज्जतदार भरलेलं Chili Pickle, तोंडाला सुटेल पाणी

त्वचेला फायदा- हिरवी मिरची जरी झणझणीत असली तरी तिचं आहारात सेवन केल्यास तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. याचं कराण म्हणजे हिरव्या मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

तसंच हिरवी मिरची विटामिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. तसंच यामध्ये बीटा- कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळतं. विटामिन सी आणि बीटा-कॅरेटीन दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असल्याने त्वचा चमकू लागते.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते- मिरचीमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने रोगप्रिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि संसर्गाचा धोका टळतो. ज्यांना इंफेक्शनमुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार होत असतात. त्यांनी आहारामध्ये हिरवी मिरची सामाविष्ट करावी.

वजन कमी करण्यास मदत- हिरव्या मिरचीचं नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. हिरव्या मिरचीमधील कॅप्सेसिन या कंपाउंडमुळे मेटाबोलिज्म जलद होण्यास मदत होते. परिणामी जलदगतीने चरबी वितळण्यास मदत होते आणि वजन कमी होतं.

शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं- मिरचीच्या सेवनामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. यातील कॅप्सेसिन कंपाऊंडमुळे मेंदूमधील हायपोथेलेमस या कुलिंग सेंटरला सक्रिय राहण्यास मदत मिळते. परिणामी शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं.

मूड चांगला होण्यास होते मदत- हिरव्या मिरचीच्या सेवनामुळे एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते.तसचं मूड स्विंग्सवर नियंत्रण राखत येतं. तसचं यामुळे वेदना कमी होण्यासही मदत होते.

अशा प्रकारे तुम्ही आहारामध्ये विविध माध्यमातून हिरव्या मिरचीचा समावेश करून तिचा आरोग्यासाठी लाभ करून घेऊ शकता. तुम्ही भाजी किंवा आमटीमध्ये हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे भरली मिरची, मिरचीचा ठेचा, लोणचं यांचा समावेश करू शकता.किंवा अगदी मिरची कच्ची चावूनही खाऊ शकता.

हे देखिल वाचा-

हिरव्या मिरचीचे फायदे
हिरवी मिरची जास्त दिवस टिकत नाही, मग या पद्धतीने करा Green Chille स्टोअर अनेक दिवस राहिल एकदम ताजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.