आरोग्य तज्ञांच्या मते साखर आणि मिठाचं अतिसेवन हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. साखर आणि मिठाला Salt स्लो पॉयझन म्हणजेच एक प्रकारचं विष समजलं जात. जास्त साखरेचं Sugar सेवन केल्यास मधुमेह, वजन वाढणे अशा समस्यां निर्माण होवू शकतात. Marathi Health Tips over consumption of salt may turn harmful to body
त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात मिठाचं सेवन देखील आरोग्यासाठी घातकं ठरू शकतं. खरं तर स्वयंपाक Cooking परिपूर्ण होण्यासाठी मीठ हा अत्यंत आवश्यक घटक आहे. यामुळे जेवणाला चव येते. मीठाशिवाय Salt जेवण बेचव लागतं.
मात्र जास्त प्रमाणात मीठाच्या सेवनाने म्हणजेच खारट पदार्थांचं अधिक सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. मिठामध्ये ४० टक्के सोडियम आणि ६० टक्के क्लोराइड उपलब्ध असतं. यामुळे शरीरामध्ये पाणी आणि खनिजांचं संतुलन राखण्यास मदत होते.
अनेकांना जेवणामध्ये थोडं जास्त मीठ खाण्याची सवय असते. बरेचजण पदार्थांवर वरून मीठ टाकून ते खातात. मात्र हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास अगदी त्वचेच्या समस्येपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
कॅल्शियमची समस्या- जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास त्याचा शरिरातील कॅल्शियमच्या Calcium पातळीवर परिणाम होतो. जास्त सोडियममुळे कॅल्शियमचं उत्सर्जन अधिक होतं आणि याचा परिणाम थेट हाडांवर होतो. यामुळे हाडांचं घनत्व कमी होवून आर्थराइटिस किंवा हाडांच्या इतर समस्या निर्माण होवू शकतात.
हृदयासाठी धोकादायक- जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो. खारटं पदार्थांच्या अति सेवनामुळे रक्तात सोडियमचं प्रमाण वाढत. यामुळे रक्तदाबावर परिणाम होवू शकतो. तसचं सोडियमच्या सेवनामुळे शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण कमी होवून स्ट्रोकचा धोका वाढतो. मिठाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा परिणाम हृदयावर होवू शकतो.
हे देखिल वाचा-
पोटाच्या कॅन्सरचा धोका- अभ्यासानुसार जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यास म्हणजेच शरिरात सोडियमची मात्र वाढल्यास पोट्याच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तज्ञांच्या मते जास्त मीठ असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील अल्सर किंवा इंफ्लमेशन वाढण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच मिठाचं योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे.
किडनीची समस्या- मिठाच्या अधिक सेवनामुळे किडनीच्या समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता वाढते. मिठाचं अधिक सेवन केल्यास शरीरातील पाणी जास्त प्रमाणात लघवी वाटे शरीराबाहेर टाकलं जातं. यामुळे किडनीवर जास्त दबाव निर्माण होतो. परिणामी किडनीच्या समस्य़ा वाढू शकतात.
त्वचेसंबधीच्या समस्या- मिठाचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. यामुळे त्वचेची जळजळ होणं, खाज येणं तसचं सूज येणं अशा काही सामान्य समस्या वाढू शकतात. तसचं त्वचेवर लाल चट्टे येणं किंवना इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो.
मिठाचं किती प्रमाणात सेवन करावं
अभ्यासानुसार एका निरोगी व्यक्तीने दिवसभरामध्ये १५०० ते २००० मिलीग्रॅम मिठाचं सेवन करणं सुरक्षित असल्याचं मानलं जातं. यामध्ये तुमच्या दिवसभरातील संपूर्ण आहाराचा म्हणजेच नाश्ता, दोन्ही वेळेचं जेवणं याशिवाय चिप्स, फरसाण किंवा इतर स्नॅक्स या संपूर्ण आहाराचा समावेश होतो. म्हणजेच दिवसभरात एका व्यक्तीने साधारणं १ चमचा मिठाचं सेवन करावं. याहून अधिक मीठ शरीरासाठी घातक ठरू शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.