महाराष्ट्र इतका धो धो पाऊस पडतो आहे . अशावेळी कधी कधी घरातल्या सगळ्या भाज्या संपतात. मार्केटमधून भाज्या आणायचा कंटाळा येतो मग तेव्हा तुम्ही खायला गरमागरम मसाले भात (Masale Bhat) करु शकता. हा मसाले भात खाल्ल्याने पोटही भरतं अन मनही तृप्त होतं.
चला तर मग बघू या मसाले भाताची रेसिपी..
मसाले भात साहित्य :
1) दोन वाटी तांदूळ
2) चार वाटी पाणी
3) हिरव्या मिरच्या दोन
4) मीठ ,हळद
5) तेल
6) मोहरी
8) वटाणे,शेंगदाणे
9) आल लसूण पेस्ट
10) कोथिंबीर ,कढीपत्ता
11) मिरे,लवंगा ,तमालपत्र (आपल्या अंदाजानुसार)
मसाले भाताची कृती :
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे.
नंतर मग कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी तडतडवून घ्यावी. त्यात आलं, लसूण पेस्ट कढीपत्त्याची पाने परतून टाका.
आता त्यात वटाणे आणि शेंगदाणे घालावे. या फोडणीतच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा हळद घालावी.
नंतर त्यावर धुतलेले तांदूळ घालावे आणि छान खरपूस परतून घ्यावे.आणि लंवगा ,मिरे,तमालपत्र घालावे.
नंतर त्यात मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव परतून घ्यावे. तांदूळ कुकरला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
छान सुवास सुटल्यावर त्यात चार वाटी गरम पाणी घालावे.
आता हे झाकण न लावता जरा उकळजी येऊन पाणी आटू द्यावे. चांगली उकळी आल्यावर सगळ्यात शेवटी झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्याव्यात आणि नंतर गॅस बंद करावा.
गॅस बंद केल्यावर घाईघाईने कुकरचे झाकण काढू नये, वाफेवर भात शिजू द्यावा.
कुकरची वाफ गेल्यावर कुकर उघडावे कोथिंबीर आणि ओल्या खोबर ,तळलेले काजू, बारीक चिरलेला कांदा टाकून तुम्ही मसाले भाताची सजावट करु शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.