पेरु फ्लेव्हर नंतर आता कोथिंबीर आईस्क्रीम! पाहून व्हाल आश्चर्य

आइस्क्रीमचं नाव ऐकल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.
Coriander Icecream
Coriander Icecreamesakal
Updated on
Summary

आइस्क्रीमचं नाव ऐकल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.

आइस्क्रीमचं (Ice-cream) नाव ऐकल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आता अशा परिस्थितीत आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय कोण राहिल बरं? साहजिकच अनेकजण आइस्क्रीम खाण्याचे बहाणे शोधत राहतात. पण एकेकाळी लोक आपल्या आवडत्या गोष्टींसोबत असा प्रयोग करतात, ज्यामुळे सगळ्यांच्याच मनात घर करून जातं. हल्ली आइस्क्रीमच्या बाबतीतही असंच झालंय. आता जर कोणी आइस्क्रीमचा अगदी विचित्र प्रयोग केला तर मग ते लोक गप्प कुठे बसणार होते? याचा परिणाम सोशल मीडियावरही (Social Media)पाहायला मिळाला.

Coriander Icecream
पाणीपुरीचं आईस्क्रीम..काय काय खायचं! नेटकरी वैतागले

यावेळी मॅकडोनाल्डने (McDonald's) आइस्क्रीमचा असा प्रयोग केला की, जो लोकांना अजिबात आवडला नाही. खरं तर मॅकडोनाल्डने चीनमध्ये (China) कोथिंबिरीने सजवलेलं खास आइस्क्रीम बाजारात आणलं आहे. फास्ट फूड चेन चालविणाऱ्या या बड्या कंपनीने Cilantro Sundae नावाचे हे डेजर्ट लिमिटेड एडिशन म्हणून सादर केलयं. 25 फेब्रुवारीपर्यंतच लोकांना उपलब्ध असणार आहे. आइस्क्रीम म्हणजेच आपल्या कोथिंबिरीच्या चटणीत धणे (Coriander) आणि लेमन सॉस टाकले जातात. या आइस्क्रीमची किंमत भारतीय चलनात जवळपास 77 रुपये ठेवण्यात आली आहे.

Coriander Icecream
कसं खायचं! मॅगी आईस्क्रीम रोल पाहताच नेटकरी वैतागले

हे आगळेवेगळे आइस्क्रीम सोशल मीडियावर टाकताच अनेकांना धक्काच बसला, तर काही जणांनी एकदा त्याची टेस्ट करण्याची इच्छा व्यक्त केलीय. कोथिंबिर असलेले हे आइस्क्रीम लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. लोकांच्या आवडत्या गोष्टींसोबत असा प्रयोग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीयेय. पण दरवेळेप्रमाणे यावेळीही लोक या नव्या डिशमुळे खूप नाराज दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.