Methi Chutney: हिवाळ्यात खायला पौष्टिक अशी मेथीची चटणी कशी तयार करायची?

मेथीमुळे भूक आणि पचन सुधारते.
Methi Chutney
Methi ChutneyEsakal
Updated on

हिवाळ्यात हिरवी मेथी बाजारात येऊ लागते. मेथीमध्ये प्रथिने, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, बी, मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि पाणी असते. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती मुख्यतः प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. जेवणात चव वाढवणे, मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते बद्धकोष्ठता दूर करण्यापर्यंत मेथीचे दाणे तुमची त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. 

आता बघू या मेथीचे आयुर्वेदिक फायदे काय आहे?

मेथीमुळे भूक आणि पचन सुधारते. यासोबतच ते ब्रेस्ट मिल्क सुद्धा वाढवते. हे मधुमेह नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब सुधारते. केस गळणे, पांढरे केस आणि युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. रक्ताची पातळी सुधारते. एनिमियावर उपचार करते आणि रक्त डिटॉक्सिफाय करण्यात देखील मदत करते. मज्जातंतु वेदना, अर्धांगवायू, बद्धकोष्ठता, पोटदुखी, सूज, शरीराच्या कोणत्याही भागात वेदना जसे पाठदुखी, गुडघेदुखी, स्नायू पेटके यांसारख्या वात विकारांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. खोकला, दमा, ब्राँकायटिस, छातीतील रक्तसंचय आणि लठ्ठपणा यासारखे कफाचे विकार बरे करण्यास मदत करते.

आता बघू या हिवाळ्यात खायला पौष्टिक अशी मेथीची चटणी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी

Methi Chutney
Malai Peda Recipe: तुळशी विवाह स्पेशल घरच्या घरी तयार करा मलाई पेडा

साहित्य:-

1) मेथीदाणे लहान एक चमचा

2) मेथीपाने एक वाटी

3) लसूण 10 ते 12 पाकळ्या

4) लाल मिरची आवडीनूसार

5) मीठ,साखर चवीनूसार

6) लिंबू

7) तेल

Methi Chutney
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

कृती:

प्रथम एका पॅनमधे तेल गरम करून त्यामधे मेथीदाणे टाकावेत.नंतर लसूण,मिरची टाकावी व शेवटी मेथीची पाने टाकावीत आणि मंद आचेवर सर्व कोरडे होईपर्यंत परतावे.

नंतर सर्व साहीत्य थंड झाल्यावर चवीसाठी मीठ व साखर घालून मिक्सरमधे भरडच वाटावे. वाटलेले मिश्रण एका बाऊलमधे काढावे व वरून लिंबू पिळावे व नीट हलवून वाढावी. ही चटणी चवीला अतिशय रूचकर व खमंग लागते.तसेच मधुमेहासारख्या आजारात लाभदायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.