तुम्ही बऱ्याचदा पोहे तयार करून नाश्त्यात खात असाल. हलका नाश्ता करण्यासोबतच ते आरोग्यदायी आणि पौष्टिक देखील आहे. कारण शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कॉर्न, मटार, इतर भाज्या अशा अनेक गोष्टी पोहे बनवण्यासाठी वापरल्या जातात. आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे पोहे आणखी पौष्टिक होतील.
या ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये स्प्राउट्स देखील टाकू शकता. या रेसिपीचे नाव आहे मिक्स्ड स्प्राउट्स पोहे. यामध्ये मूग, हरभरा इत्यादी मोड आलेली कडधान्यं टाकू शकता. तुम्ही ते नाश्त्यासोबत तसेच संध्याकाळी स्नॅक्ससोबत खाऊ शकता. येथे मिक्स स्प्राउट पोहे बनवण्याचे साहित्य आणि पद्धत जाणून घेऊया.
मूग, हरभरा- 1 वाटी
पोहे - 2 कप
बटाटा - अर्धी वाटी
कांदा - 1 मोठा
हिरवी मिरची - 2-3
कढीपत्ता - 3-4
शेंगदाणे - एक टेबलस्पून
मोहरी - अर्धा टीस्पून
चाट मसाला - अर्धा टीस्पून
हळद पावडर - अर्धा टीस्पून
साखर - 1 टीस्पून
लिंबाचा रस - 1 चमचे
आवश्यकतेनुसार तेल
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर - 1 टेबलस्पून
नारळ - 1 टेबलस्पून किसलेले
जर तुम्हाला एखाद्या दिवशी नाश्त्यासाठी मिक्स स्प्राउट पोहे तयार करून खायचे असतील तर मूग, हरभरा इत्यादी काही धान्य दोन ते तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यांना हलके उकळवा. बटाटे उकळून त्याचे लहान तुकडे करा. तसेच कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. सजवण्यासाठी नारळ किसून घ्या. कढईत तेल न घालता शेंगदाणे हलके भाजून घ्या. आता पोहे पाण्याने स्वच्छ करून चाळणीत ठेवा म्हणजे पाणी निघून जाईल. उकडलेल्या बटाट्यात मोड आलेली कडधान्यं, चाट मसाला घालून मिक्स करा.
आता एका कढईत थोडे तेल टाकून गरम करा. त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची, मोहरी घालून काही सेकंद परतून घ्या. आता चिरलेला कांदा घालून एक मिनिट परतून घ्या. त्यात साखर, मीठ आणि हळद घालून मिक्स करा. आता बटाटा आणि मोड आलेली कडधान्यं मिश्रण घालून मिक्स करा. पोहे, भाजलेले शेंगदाणे, मीठ, मिक्स करून वरून हलके पाणी शिंपडा आणि झाकून ठेवा. दोन मिनिटे शिजवा. एका भांड्यात काढा. त्यात लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले खोबरे घालून सजवा.