२०२० प्रमाणे २०२१ चा बराचसा काळ लोकांनी घरीच घालवला. कोरोनाचा काळ असल्याने लोकांना घरी (Home) बराच वेळ होता. म्हणून मग लोकांनी विविध पदार्थ (Food) करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांचा वेळही चांगला गेला शिवाय विविध खाद्यपदार्थ त्यांना करून बघता आले. लोकांनी स्वत:ला कसे बिझी ठेवले हे जर पाहायचे असेल तर गुगल ट्रेंडवर (Google Trends) बघता येईल. २०२१ सालात लोकांनी खाद्यपदार्थांच्या विविध रेसिपीज शोधल्या आणि ते पदार्थ केले. गुगल ट्रेंडने या पदार्थांची यादी दिली आहे. उकडीच्या मोदकाने यावर्षी गुगल ट्रेंडमध्ये अव्वल स्थान मिळवेलच. शिवाय एनोकी मशरूम, मेथी मटर मलाई, पालक, चिकन सूप, कुकीज, पोर्न स्टार मार्टिनी, मटार पनीर, काढा या पदार्थांचा रेसिपी जास्त शोधल्या गेल्या.
उकडीचे मोदक (Ukdiche Modak) कसे करतात, गणपतीला उकडीचे का करावेत, उकडीचे मोदक जवळपास कुठे मिळतील असे वेगवेगळ्या प्रकारे यावर्षी उकडीचे मोदक शोधले गेले.
तसेच इतर शोधांमध्ये लोकांना आवडणाऱ्या गोष्टी घरी करून बघण्यासाठी त्यांनी गुगलवर रेसिपी शोधल्या. त्यात एनोकी मशरूम, लझानिया आणि पोर्न स्टार मार्टिनी या पदार्थाचा समावेश होता. लॉकडाऊनमुळे लोकांनी जागतिक पाककृती करण्यावर खूप इंटरेस्ट दाखवला हे यातून स्पष्ट होते.
तसेच मटार पनीर, मेथी मटर मलाई या पदार्थांना स्थान होतेच. पण, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा काढा ही या ट्रेंडमध्ये होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.