Moong Dal Toast Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मूग डाळ टोस्ट', ही आहे सोपी रेसिपी

नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांसाठी पौष्टिक मुगाच्या डाळीचा टोस्ट..
Moong Dal Toast Recipe
Moong Dal Toast Recipesakal
Updated on

मूग डाळ मध्ये भरपूर प्रथिने असतात. मूग डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणात आरामात खाऊ शकता. पालक अनेकदा तक्रार करतात की त्यांच्या मुलाला हेल्‍दी ब्रेकफास्‍ट करायचा नाही. अशा परिस्थितीत मुलांना सकाळी नाश्त्यात काय द्यायचे या विचाराने पालक चिंतेत पडतात. तर, तुम्ही त्यांना 'मूग डाळ टोस्ट' नक्की खायला द्या. ते चवीला इतकं छान आहे की मुलं आवडीने खातील.

मूग डाळ टोस्ट कसा बनवायचा

लागणारे साहित्य

1 कप धुतलेली मूग डाळ

1/4 कप बारीक चिरलेला कांदा

1/4 कप बारीक चिरलेला टोमॅटो

1 बारीक चिरलेली हिरवी मिरची

1 छोटा तुकडा किसलेले आले

1/2 टीस्पून हळद पावडर

1/2 टीस्पून लाल तिखट

चवीनुसार मीठ

ब्रेड स्लाइस

तळण्यासाठी तेल किंवा तूप

Moong Dal Toast Recipe
Bread Vada Recipe : नाश्त्याला सँडविचऐवजी बनवा 'ब्रेड वडा', सगळ्यांना आवडेल चव, ही आहे रेसिपी

बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मूग डाळ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले, हळद, तिखट आणि मीठ एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या. असे केल्याने सर्व साहित्य चांगले एकजीव होईल. आता कढईत तेल किंवा तूप गरम करा. एका ब्रेड स्लाइसवर मुगाच्या डाळीचे मिश्रण लावा आणि त्याच्या वर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा. आता मंद आचेवर भाजून घ्या. ब्रेडचे तुकडे गोल्डन आणि कुरकुरीत झाले की गरमागरम मुलांच्या आवडत्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

Crossword Mini:

Related Stories

No stories found.