Moong Sprouts Dosa Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी 'मूग स्प्राउट्स डोसा'; जाणून घ्या सोपी रेसिपी

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक हेल्दी डिश घेऊन आलो आहोत जी केवळ चवदारच नाही तर पौष्टिकही आहे.
Moong Sprouts Dosa
Moong Sprouts Dosa sakal
Updated on

आजच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे आणि फिटनेसकडे खूप लक्ष देतात. खरंतर, फास्ट फूड खाल्ल्याने वजन वाढते आणि अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे लोक आता आपल्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करू लागले आहेत.

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक हेल्दी डिश घेऊन आलो आहोत जी केवळ चवदारच नाही तर पौष्टिकही आहे. चला जाणून घेऊया मूग स्प्राउट्स डोसा कसा बनवला जातो.

मूग स्प्राउट डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप पौष्टिक मूग स्प्राउट्स
1 कप तांदळाचे पीठ
1/4 वाटी चना डाळ
1/4 कप उडीद डाळ
1/2 टीस्पून हिंग
1/2 टीस्पून इनो
1 टीस्पून मीठ
तेल

Moong Sprouts Dosa
Fried Rava Idli Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी फ्राईड इडली, जाणून घ्या रेसिपी!

हा डोसा कसा बनवायचा?

सर्वप्रथम मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर भिजवलेली मूग डाळ, तांदळाचे पीठ, चणा डाळ, उडीद डाळ, हिंग, इनो आणि मीठ घालून पीठ तयार करा

डोसा बनवण्यासाठी नॉन-स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा, तव्यावर थोडे तेल टाका आणि पातळ डोसा बनवा.

आता त्यात स्टफिंग मिश्रण चांगले पसरवा आणि डोसा फोल्ड करा. तुमचा मूग स्प्राउट डोसा तयार आहे.

सांबार, टोमॅटो चटणी किंवा नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.

तुमच्या दिवसाची सुरुवात जर तुम्ही अशा हेल्दी नाश्त्याने केली तर दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल.

Related Stories

No stories found.