Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही

Healthy Cutlet Recipe: तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल तर सकाळी नाश्त्यात बहुगुणी कटलेट बनवून आस्वाद घेऊ शकता.
Cutlet Recipe:
Cutlet Recipe:Sakal
Updated on

सकाळ साप्ताहिक-

रेखा नाबर

सकाळी नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण रोज नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न महिलांना असतो. आज आम्ही तुम्हाला मूग, मटकी आणि बटाट्याचा वापर करून कटलेट कसे बनवतात हे सांगणार आहोत.

मूग, मटकी, ज्वारी, नाचणीमध्ये आरोग्यदायी घटक असतात. जर तुमच्या घरात लहान मुले असे पदार्थ खात नसतील तर तुम्ही कटलेट बनवू शकता. हे कटलेट बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊयाकटलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

बहुगुणी कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तीन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

मूग

मटकी

२ वाट्या कोबी व गाजर कीस

२ टेबलस्पून पेस्ट (लसूण, मिरची, कोथिंबीर,आले)

१ वाटी नाचणी पीठ

१ वाटी ज्वारी पीठ

२ टेबलस्पून धणे जिरे पूड

सैंधव

गूळ

बारीक रवा

तेल

Cutlet Recipe:
Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटे वड्याचे आप्पे, जाणून घ्या रेसिपी

बहुगुणी कटलेट बनवण्याची कृती

बहुगुणी कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे सोलून परातीत त्याचा लगदा करावा.

नाचणी व ज्वारीच्या पीठात मटकी, भिजवलेले मूग, किस, पेस्ट, धणे जिरे पूड, सैंधव, किंचित गूळ घालून व्यवस्थित मळून घ्यावे.

कटलेट थापून, बारीक रव्यात घोळवून फ्रायपॅनला तेल लावून दोन बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.

टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.