Morning Breakfast Recipe: घरीच झटपट बनवा शिंगाड्याच्या पिठाचा पौष्टिक हलवा, जाणून घ्या रेसिपी

Shingada Halawa Recipe: चला तर मग जाणून घेऊया शिंगाड्याचा हलवा बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता असते आणि तो कसा बनवतात.
Breakfast Recipe| Shingada Halawa
Breakfast Recipe| Shingada HalawaSakal
Updated on

सकाळ साप्ताहिक- उषा लोकरे

Shingada Halawa Recipe: सकाळी नाश्त्यात शिंगाड्याचा पिठाचा हलवा खाल्यास दिवसभर थकवा जाणवणार नाही. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यदायी असतात. उपवास आणि सणांमध्ये ते खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्हाला गोड पदार्थ खायची इच्छा असेल तर शिंगाड्याचा हलवा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला शिंगाड्याच्या पीठाची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शिंगाड्याचा हलवा बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता असते आणि तो कसा बनवतात.

शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक वाटी शिंगाड्याचे पीठ

१ वाटी साजूक तूप

पाऊण वाटी साखर

२ कप उकळते पाणी

अर्धा चमचा वेलदोडा पूड

काजू व बदाम काप

Breakfast Recipe| Shingada Halawa
Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवण्याची पद्धत

कढईत तूप गरम करून त्यात शिंगाड्याचे पीठ खमंग तांबूस रंगावर भाजून घ्यावे.

त्यात उकळते पाणी घालून झाकण ठेवावे व मिश्रण मऊसर शिजवावे.

पाणी आटल्यावर त्यात साखर घालावी व ढवळावे.

पुन्हा झाकण ठेवून मिश्रण शिजवावे.

तूप सुटू लागले की तयार हलव्यात वेलदोडा पूड मिसळावी.

काजू व बदामाच्या कापांनी सजवून सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.