Paneer Pancake Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा पनीर पॅनकेक, चवीसोबतच सुधारेल आरोग्य, जाणून घ्या रेसिपी

Paneer Pancake Recipe: तुम्हाला पनीरपासून नवा पदार्थ तयार करायचा असेल तर पनीर पॅनकेक तयार करू शकता.
Paneer Pancake Recipe
Paneer Pancake RecipeSakal
Updated on

Paneer Pancake Recipe: दिवसाची सुरुवात हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अनेक लोक नाश्त्यासाठी असे आरोग्यदायी आणि चवदार पर्याय शोधत असतात. तुम्हीही सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य पर्याय शोधत असाल तर पनीर पॅनकेक बनवू शकता.

पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने, फायबर, पोटॅशियम यासरखे अनेक पोषक घटक असतात. पनीर पॅनकेक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

पनीर पॅनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

250 ग्रॅम किसलेले पनीर

चवीनुसार मीठ

1 टीस्पून साखर

2 चमचे मैदा

1 अंडे

2 चमचे तेल

2 चमचे बटर

मेपल सिरप किंवा मध

Paneer Pancake Recipe
Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा क्रिस्पी कॉर्न कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी

पनीर पॅनकेक बनवण्याची कृती

पनीर पॅनकेक बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पनी, मीठ, साखर आणि मैदा चांगले एकत्र करा.

नंतर एक अंडे फोडून चांगले मिसळा.

पीठ चांगले मळून झाल्यावर बाजूला ठेवा.

नंतर नॉन-स्टिक पॅनमध्ये तुप गरम करा आणि पॅनकेक्स दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.

नंतर त्यावर मॅपल सिरप घाला किंवा मध घालून गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.