Idali Pizza Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा इडली पिझ्झा, नोट करा रेसिपी

Idali Pizza Recipe: तुम्हाला सकाळी नाश्त्यात काही चवदार बनवायचे असेल तर इडली पिझ्झा बनवू शकता.
Idali Pizza Recipe:
Idali Pizza Recipe:Sakal
Updated on

Idali Pizza Recipe: मुलांना शाळेत रोज डब्यात काय द्यावे हा रोज प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला इडली पिझ्झा कसा बनवतात याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. तसेच कमी वेळेत तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया इडली पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

इडली पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक वाटी उडीद डाळ

१ टीस्पून मेथी दाणे

अर्धा वाटी बारीक रवा

सैंधव

लहान टोमॅटो

सिमला मिरची

कोबी

फ्लॉवर बारीक चिरून

बारीक चिरलेली कोथिंबीर

चीज

इडली पिझ्झा बनवण्याची कृती

इडली पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात आधी आदल्या दिवशी सकाळी उडीद डाळ धुवून, मेथीदाणे घालून बेताच्या पाण्यात भिजवावी. रात्री त्याच पाण्यात वाटावी. फेटून झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सैंधव व रवा घालून फेटून अर्धा तास झाकून ठेवावे. थाळीत आतून तेलाचा हात लावून मिश्रण ओतावे. कुकरमध्ये शिटी न लावता पंधरा मिनिटे वाफवावे. हा झाला पिझ्झा बेस. सर्व भाज्या बारीक कापून त्याची एकत्रित भाजी आधीच करून ठेवावी. शिजलेली भाजी बेसवर पसरावी. वर चीज किसून घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.