Jaggery Poha Recipe: हिवाळा सुरू झाला असून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात योग्य आहार असेल तर तुम्हाला बदलत्या वातावरणात त्रास होणार नाही. शरीराला आतुन उबदार ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करावे. हिवाळ्यात गुळाचे सेवन करणे आरोग्यदायी ठरते. गुळापासून गोड पोहे तयार करू शकता. हे पोहे बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत.
सकाळी नाश्त्यात गुळ पोहे खाल्यास अशक्पणा दूर होतो. पोह्यात असलेले कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देते. तर अँटी-ऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध असलेला गूळ शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो. याशिवाय गुळामध्ये लोह देखील असते. तसेच हाडं मजबूत होतात. चला तर मग जाणून घेऊया गुळ पोहे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.