Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड रोल, वीकेंड होईल खास

Perfect Bread Roll Recipe: वीकेंड स्पेशल बनवायचा असेल तर सकाळी नाश्त्यात चवदार ब्रेड रोल बनवू शकता.
Perfect Bread Roll Recipe:
Perfect Bread Roll Recipe:Sakal
Updated on

Perfect Bread Roll Recipe: अनेकांना वीकेंडला खास बनवण्यासाठी काही तरी नवीन पदार्थ बनवण्याची इच्छा असते. तुम्ही या वीकेंडला ब्रेड रोल बनवून घरातील सदस्यांना आनंदी करू शकता. ब्रेड रोल बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. तसचे हा पदार्थ झटपट तयार होतो. तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर टिफीनमध्ये सोबत देखील घेऊन जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया ब्रेड रोल बनवण्याची सोपी पद्धत कोणती.

ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड

उकळलेले बटोटा

कोथिंबीर

तिखट

चाट मसाला

आलं-लसूण पेस्ट

बारिक चिरलेली कांदा

बारिक चिरलेली शिमला मिरची

बारिक चिरलेली हिरवी मिरची

मीठ

ब्रेड रोल बनवण्याची कृती

सर्वात पहिले उकळलेले बटाटे बारिक करून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर, तिखट, चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट, बारिक चिरलेली कांदा, बारिक चिरलेली शिमला मिरची, बारिक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर त्याचे उभ्या आकारात गोळे बनवून घ्यावे. नंतर ब्रेडचे कडे काढून घ्यावे. पाण्यात टाकून पिळून घ्यावे. नंतर बटाटच्याचे सारण त्यात भरावे. नंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे आणि त्यात दोन्ही बाजून चांगले तळून घ्यावे. तयार ब्रेड रोलचा टोमॅटो सॉससोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.