Paneer And Sweet Corn Appe: वीकेंडला अनेक लोक नाश्त्याला बाहेर जाण्याचा विचार करतात. पण पावसामुळे बाहेरचे पदार्थ खाण्याची भिती वाटत असेल तर या वीकेंडला घरीच चवदार अप्पे बनवू शकता. यासाठी पनीर आणि स्वीट कॉर्नची गरज असेल. पावसाळ्यात बाजारांमध्ये स्वीट कॉर्न मोठ्या प्रमाणात विक्रीस असतात. तसेच पनीर आणि स्वीट कॉर्नमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यदायी असतात. यामुळे सकाळी पौष्टिक नाश्ता करायचा असेल तर पनीर आणि स्वीट कॉर्न अप्पे तयार करू शकता. हे अप्पे बनवणे खुप सोपे आहे. तसेच घरातील सर्व सदस्यांना देखील खुप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया पनीर आणि स्वीट कॉर्न अप्पे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे.