Mushroom Sandwich : सकाळच्या नास्ताला हेल्दी मशरूम सँडविच कसे तयार करायचे?

प्रत्येकवेळी जेवनामध्ये काहीतरी वेगळे असावे, अशी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच अपेक्षा असते.
Mushroom Sandwich
Mushroom SandwichEsakal
Updated on

Food: प्रत्येकाला दररोज एकच पदार्थ  खायला आवडत नाही. प्रत्येकवेळी जेवनामध्ये काहीतरी वेगळे असावे, अशी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र, घरातील महिलांना दरवेळी मोठा प्रश्न हाच असतो की, नवीन खाण्यासाठी काय करावे? विशेष म्हणजे लहान मुलांसाठी कारण त्यांना आवडले पण पाहिजे आणि ते हेल्दी देखील असावे. तर आज आम्ही तुम्हाला एका खास डिशबद्दल सांगणार आहोत. जी खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील असेल घरातील प्रत्येकजण आवडीने खाईल. चला तर मग आजच्या लेखात बघूयात मशरूम सँडविचची खास रेसिपी!

साहित्य:

1) ब्रेड स्लाइड 10-12

2) बटन मशरूम (आवश्यकतेनुसार)

3) एक चमचा लसूण 

4) एक बारीक चिरलेला कांदा

5) एक वाटी बारीक चिरलेली कोबी 

6) एक बारीक चिरलेली शिमला मिरची

7) चार ते पाच मिरच्या

 8) दोन चीज क्यूब

9) दोन चमचे टोमॅटो सॉस 

10) काळी मिरी पावडर

11) बटर

12) तेल 3 चमचे

13) मीठ 

Mushroom Sandwich
Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने पौष्टिक दिवशे कसे तयार करतात?

कृती:

सर्वप्रथम मशरूम सँडविच बनवण्यासाठी कांदा, लसूण, शिमला मिरची सर्व बारीक चिरुन घ्या.आता एका कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.तेल गरम झाल्यावर त्यात मशरूम, कांदा आणि लसूण घालून तळून घ्या. सर्व साहित्य 1-2 मिनिटे परतून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेली कोबी आणि शिमला मिरची घालून शिजवा. सर्व साहित्य 1-2 मिनिटे भाजल्यानंतर त्यात काळी मिरी, टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.30 सेकंद शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि तयार मसाले एका भांड्यात काढून घ्या.आता ब्रेडचे तुकडे घ्या आणि त्यावर बटर पसरवा. यानंतर तयार मसाला ब्रेडच्या स्लाइसवर चांगला पसरवा. आता त्यावर चीज किसून घ्या.त्यावर शिमला मिरची आणि मशरूमचे तुकडे ठेवा आणि ब्रेडचे तुकडे बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा.180 डिग्री सेंटीग्रेडवर 5 मिनिटे बेक केल्यानंतर सँडविच बाहेर काढा.चविष्ट मशरूम सँडविच गरमागरम टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.