Nag Panchami 2023: नागपंचमीच्या पूजेसाठी बनवा हा प्रसाद, जाणून घ्या सोपी रेसिपी

यंदा २१ ऑगस्टला नागपंचमीचा सण साजरा होणार आहे.
Nag Panchami
Nag Panchami sakal
Updated on

नागपंचमी हा सण नाग देवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्य श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात होत आहे. श्रावण महिन्यातल्या पहिल्याच सोमवारी नागपंचमी आहे. हा एक दुर्मिळ योगायोगच समजला जात आहे.

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा केली जाते. म्हणूनच या पंचमीला नागपंचमी म्हणतात. यंदा २१ ऑगस्टला नागपंचमीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी नागदेवतेच्या पूजेसाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. जो नाग देवाला अर्पण केला जातो.

अनेक ठिकाणी शेतकरी नागपंचमीच्या दिवशी शेतात जात नाहीत, ते त्यांच्या शेताच्या काठावर दूध ठेवतात आणि नारळही अर्पण करतात. दक्षिण भारतात नागपंचमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. अशा परिस्थितीत नागपंचमीला बनवल्या जाणार्‍या काही खास प्रसादाबद्दल जाणून घेऊया.

दिंड रेसिपी

दिंड बनवण्यासाठी आधी सारण बनवा. २ वाट्या चणा डाळ धुवून भिजवावी, भिजल्यावर कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. चणा डाळीतील पाणी वेगळे करा आणि एका जाड तळाच्या पॅनमध्ये मध्यम आचेवर ठेवा. हरभरा गरम झाल्यावर त्यात गूळ घालून मिश्रण घट्ट होऊ द्यावे. घट्ट झाल्यावर गॅस बंद करून त्यात जायफळ पावडर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. आता याला कव्हर करण्यासाठी पीठ तयार करा. गव्हाच्या पिठात मीठ आणि तेल मिसळा आणि पीठ मळून घ्या आणि 20 मिनिटे सोडा. आता गोलाकार पुरीप्रमाणे लाटून मधोमध सारण भरून वाफेवर शिजवून घ्या. तुमचा दिंड प्रसाद तयार आहे.

Nag Panchami
Nag Panchami 2023 : नागपंचमीला का करतात नागाची पूजा? काय आहे कारण, जाणून घ्या

पाथोली कशी बनवायची

तांदूळ एक-दोन तास भिजत घालून ठेवा आणि त्यात मीठ आणि गूळ घालून बारीक करा. याची गुळगुळीत पेस्ट करा बाजूला ठेवा. आता पुरणासाठी खोबरे आणि गूळ बारीक चिरून त्यात वेलची टाका आणि हलकेच कुस्करून सर्व मिक्स करा. आता केळीच्या पानांवर तांदळाचे पीठ पातळ करून मधोमध खोबरे व गुळाचे सारण भरून पानाची घडी करून पॅक करा. हे पान 10-15 मिनिटे वाफेवर शिजवा. अशा प्रकारे सर्व पिठापासून पाथोली बनवा आणि नागदेवतेला प्रसाद द्या.

कडबू रेसिपी

कडबू बनवण्यासाठी अर्धा ग्लास तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, एक वाटी चणाडाळ एक किंवा दोन तास आधी भिजवावी. आता ते ओले झाल्यावर भातामध्ये अर्धा चमचा मीठ घालून बारीक वाटून घ्या. आता सारणासाठी हरभरा आणि उडीद डाळीत मिरची, मीठ, कढीपत्ता, आले, हिंग आणि काळी मिरी घालून बारीक करा. आता प्रथम केळी किंवा हळदीच्या पानात तांदळाचे पीठ पसरवा, नंतर त्यावर २ चमचे उडीद डाळीचे सारण भरा. पान गुंडाळून 10-15 मिनिटे वाफवून घ्या, तुमचा कडबू तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.