नागपूर : आपल्या संस्कृतीत अन्न हे परब्रह्मरूप मानलेले आहे. भरलेल्या ताटाला नमस्कार करायची आपली संस्कृती आहे. अन्न आपल्या ताटापर्यंत आणून पोहोचवणाऱ्या ईश्वराचे, पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे, शिजवून ताटात वाढणाऱ्या लोकांचे आपण आभार मानतो. ताटावरून भरल्या पोटी तृप्तीची ढेकर देऊन उठतो. मग अशा अन्नाचा आपण अपमान करण्याचा विचारही डोक्यात येऊ देऊ शकत नाही. यामुळेच आपण उरलेले अन्न फेकून न देता पुन्हा गरम करून खातो, हीच आपली संस्कृती आहे. मात्र, तुम्ही पुन्हा अन्न गरम करून खात असाल तर सावध व्हा. सविस्तर माहितीसाठी सविस्तर वाचा...
मोजकाच स्वयंपाक करणे आपल्याला शिकवलेले नाही. घरी असलेल्या सदस्यांशिवाय एक जास्तीच्या व्यक्ती जेवण करू शकेल इतके अन्न आपल्या संस्कृतीत शिकवले आहे. म्हणून घरी कमी अधिक प्रमाणात अन्न शिल्लक राहते. हे शीळ अन्न आपण फेकून न देता दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून आपण अस करीत असतो.
अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण अस करीत असलो तरी आरोग्यासाठी अन्न देखील आपल्याला गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरू शकते. एका संशोधनानुसार असे नऊ पदार्थ आहे जे पुन्हा पुन्हा गरम करून खाल्यास आपल्या शरीराला मोठी हाणी होऊ शकते. तसेच काही असाध्य आजारांच्या जाळ्यात आपण अडकू शकतो.
हॉटेलमध्ये आपण खात असलेले पदार्थ एकाच तेलात अनेकदा तयार केले जाते. हेच तेल आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. तेव्हा एकदा शिजवल्यानंतर पुन्हा त्या तेलामध्ये अन्न गरम केले नाही पाहिजे.
रोजच्या जेवणात आपण भात खात असतो. परंतु, तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर दोन तासांच्या आत भात खाल्ला नाही तर हाच भात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. तांदूळ शिजवल्यानंतर बराच काळ मध्यम तापमानावर ठेवल्यामुळे तुळस सेरियस नावाच्या सूक्ष्मजिवाला जन्म होतो. त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
पालक हे शिजूनवच खाल्ले जाते. एकदा पालक शिजवल्यानंतर पुन्हा गरम केल्याने कर्करोगाला कारणीभूत पदार्थ निर्माण होतो. म्हणून पालक पूर्णपणे न शिजवता हलकं गरम करा. पालक नायट्रेट, नायट्रेट्स असलेल्या अन्नातून बनविला जातो. हे सहा वर्षांखालील मुलांसाठी सुरक्षित नाही. पालकाचा अनेक बेबी प्युरीमध्ये वापर केला जातो. म्हणून त्यांना पुन्हा गरम करणे हानिकारक ठरू शकते.
बीट आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. तसेच अशक्तपणा जाणवत नाही. बिटामध्ये नायट्रिक ऑक्साइड असते. यामुळे बिटापासून तयार केलेले अन्न तुम्ही योग्य प्रकारे थंड न करता पुन्हा गरम केले तर नायट्रेट्सवरून नायट्रेटमध्ये रूपांतरित होते. यानंतर नायट्रोसामाईनमध्ये रूपांतरित होते. यातील काही कार्सिनोजेनिक (कर्करोग होणारा पदार्थ) देखील मानले जातात. म्हणून बीट गरम करून खाऊ नका.
अंडे खायला कोणालाही आवडते. तसेही अंडे चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतु, अंड्याची भाजी तयार केल्यानंतर विशिष्ट वेळेच्या आत खाल्ले नाही तर तेच आरोग्यासाठी हानिकारक ठरते. अंडे उकळून किंवा भाजी करून ठेवल्यास त्यामधील साल्मोनेला बॅक्टेरिया धोकादायक बनतात. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अंडे शिजवल्यानंतर लगेच खाणे गरजेचे आहे.
आपण फ्रेंच फ्राई आणि इतर तेलकट खाद्य पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे. जेव्हा आपण अशा अन्नाला पुन्हा गरम करतो तेव्हा ते धोकादायक धूर तयार करतात. हाच धूर आपल्या आरोग्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. तेलकट पदार्थ पुन्हा गरम करायचं असेल तर ते केवळ मायक्रोवेव्हमध्ये केले पाहिजे.
स्वयंपाक घरात आलू राहतोच. केणतीही भाजी करताना याचा वापर केला जात असतो. मात्र, आलू उकळून फार वेळांनी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. आलू उकळून फार वेळासाठी सोडले तर क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम वाढण्यास मदत होते. हेच आपण नंतर खाल्ले तर गंभीर रोग होऊ शकतो.
प्रत्येक आई नवजात बाळाला स्तनातील दूध पाजत असते. लहान बाळासाठी हे सर्वांत पौष्टिक आहार आहे. परंतु, हे दूध गरम करून पाजल्यास बाळाच्या पाचक प्रणालीवर वाईट परिणाम होऊ शकतो. आईचे दूध बाटलीमध्ये घालून बाळाला दिले तर त्यांच्या तोंडात बॅक्टेरिया वाढवते. तेव्हा बाळाला आईचे दूध गरम करून देऊ नका.
कोंबडीच्या आत बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. पण, अंड्यांप्रमाणेच यात साल्मोनेला देखील असतो. चिकन शिजवल्यानंतर बराच काळ सामान्य तापमानात ठेवल्यास जिवाणू अनेक पटीने वाढवतात. चिकन शिजवताना त्याचे तापमान १६५ डिग्रीपर्यंत असले पाहिजे. हे लक्षात ठेवा चिकन कोणत्याही परिस्थितीत पुन्हा गरम करू नका. शिजवल्यानंतर ते लगेच खा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.