National Sandwich Day History : बाहेरच काहीतरी खाण्याचा विचार करताना आपण हेल्दी फुड म्हणून सँडविचला पसंती देतो. पौष्टीक असलेल्या भाज्या आणि चीजचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेले सँडविच (Sandwich) लहान मुलांपासून तरूण आणि वृद्धही आवडीने खातात. याच सँडविचचा आज वाढदिवस आहे असे म्हणावे लागेल. आज जागतिक सॅंडविच डे (world Sandwich Day) आहे. जगभरात साजरा केला जातो. जर तुम्ही फूडी आहात तर सँडविच कसे अस्तित्वात आले हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?
हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?
लॉर्ड सँडविच (Lord Sandwich ) नावाच्या तरुणाला पत्ते खेळण्याची आवड होती. असे म्हणतात की त्याला हा खेळासाठी इतका वेडा होता की, तो जागा सोडून कधीही उठला नाही. कितीही महत्त्वाचे काम असो किंवा कितीही कडक भूक लागो तो खेळात मग्न असायचा. पत्ते खेळताना काहीतरी पटकन तयार होईल असा पदार्थ त्याला हवा होता. खेळ मध्येच सोडून जेवणासाठी तो उठायचा तेव्हा प्रत्येकवेळी त्याला काहीतरी नवे खावेसे वाटायचे. पण, वेळ नसल्याने घरी शिल्लक असलेल्या भाज्या आणि ब्रेडचा उपयोग करून त्याने पहिल्यांदा सँडविच तयार केले. यामुळेच आजच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.
सँडविच खाताना हात घाण होणार नाहीत आणि भूक भागेल असे काहीतरी त्याला हवे होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सँडविचने सँडविच बनवले. त्याच्या नावावरूनच सँडविच हे नाव या भाजी भरलेल्या दोन ब्रेडना देण्यात आले. या शोधामुळे सँडविचच्या या नव्या शोधामुळे आळशी लोकांना कमी वेळात तयार होणारा पौष्टीक पदार्थ मिळाला.
भारतात कसे आले सँडविच ?
सँडविच भारतात आणण्याचे श्रेय ब्रिटिशांना देता येईल. ब्रिटीशांनी सर्वप्रथम भारतात सँडविच आणले. ब्रिटीश राजवटीत राजेशाही पदार्थात याचा समावेश होता. ज्याला भारतीय लोक डबल रोटी म्हणतात. आज जगभरात विविध प्रकारचे सँडविच उपलब्ध आहेत.
सर्वात महागडा सँडविच कोणता?
जगातील सर्वात महाग सँडविच 2004 मध्ये बनवण्यात आले होते. ते US$ 28,000 म्हणजे सुमारे 1,800,000 रुपयांमध्ये विकले गेले. तसेच सँडविचमध्ये चीज, पनीर, मायोनिज यांसारखे दुग्धजन्य पदार्थही असतात. त्यामुळे त्याचे पोषणमूल्य आणखी वाढते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे त्याला एवढी पसंती आहे.
नॅशनल सँडविच डे साजरा करण्यासाठी अमेरिकेत ऑफर्स असतात. तिथे जवळपास सर्व फूड स्टोअर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच देतात. काही दुकानात प्रथम येणाऱ्यास फ्रीमध्ये दिले जातात. कुठेतरी सँडविच विकत घेतल्यावर कोल्ड्रींक मोफत दिले जाताच आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.