Navratri 2023 : नवरात्रीच्या उत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. काल म्हणजे रविवारपासून पुढील मंगळवार पर्यंत नवरात्रीचे उपवास केले जातात. या उपवासाला नवरात्र देखिल म्हणतात. ग्रामिण भागात ग्रामदैवत असलेल्या देवांचे नवरात्र केले जाते.
या नऊ दिवसात उपवास करणाऱ्यांपुढे असा प्रश्न असतो की रोज वेगळं करायचं काय? कारण, खिचडी आणि वरी यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटा हा एकमेव पर्याय उरतो. जर तुम्ही बटाट्याचा विचार करत असाल तर पोट भरणारा एक पदार्थ कसा बनवायचा ते आज पाहुयात.
आजवर तुम्ही मैदा अन् मायोनिज, चीज घातलेले क्रिस्पी ट्रँगल्स खाल्ले असतील. तसाच पदार्थ तुम्ही उपवासालाही बनवू शकता. जो तितकाच कुरकुरीत आणि चवदार असतो.
साहीत्य – साबुदाणा पिठ, बटाटे, मिरची, मीठ, इच्छेनुसार मसाले
कृती –
सर्वात आधी बटाटे उकडण्यास ठेवा
त्यानंतर साबुदाण्याचे पीठ घ्या. पीठ तयार नसेल तर साबुदाना मिक्सरमधून बारीक करून घ्या. मिरची, जिरे एकत्र बारीक वाटून घ्या.
आता उकडलेले बटाटे घेऊन त्यात साबुदाण्याचे पीठ, मिरची पेस्ट, मीठ आणि थोडी साखर घालावी. तसेच बारीक चिरून कोथंबीरही घालावी.
हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा बनवा.पोळपाटावर हे पीठ घेऊन ते जाडसर गोलाकार थापून घ्या. आता पिठाचे पिझ्झासारखे छोटे पिस कापून घ्या.
हे पिसेस कमी तेलात फ्राय करून घ्या. मंद आचेवर तळून घेऊन काढून घ्या. आपले पोटॅटो ट्रँगल रेडी आहेत. गरम असतानाच फोडणी दिलेल्या दहीसोबत तुम्ही ते सर्व्ह करू शकता. (Navratri 2023)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.