Navratri 2023 : महानवमीला बनवा ‘हा’ स्पेशल उपवासाचा रायता, जाणून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवसांमध्ये परिपूर्ण फलाहार घेणे महत्वाचे आहे.
Navratri 2023 : महानवमीला बनवा ‘हा’ स्पेशल उपवासाचा रायता, जाणून घ्या रेसिपी
Updated on

Navratri 2023 : आज नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच महानवमीचा दिवस आहे. आज नवरात्रीचा अखेरचा दिवस असून उद्या नवरात्रौत्सवाची समाप्ती असणार आहे. नवरात्रीची समाप्ती आणि विजयादशमीचा उद्या सण आहे. त्यामुळे, सर्वत्र त्याची धामधूम पहायला मिळतेयं.

या नवरात्रौत्सवात अनेक जण उपवास करतात. आज महानवमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास देखील करतात. तसेच, आजच्या दिवशी घरोघरी कन्यापूजा केली जाते. या उपवासाच्या दिवसांमध्ये निरोगी राहण्यासाठी परिपूर्ण आहार घेणे महत्वाचे आहे.

उपवासाला नेहमीचे पदार्थ करण्याऐवजी आज आम्ही तुम्हाला खास फळांची रेसिपी सांगणार आहोत. आजच्या महानवमीला ही फळांपासून बनवली जाणारी पौष्टिक रेसिपी अवश्य करा.

फळांपासून बनवला जाणारा हा रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • केळी

  • १ सफरचंद

  • ८-१० द्राक्षे

  • खरबूज

  • काकडी

  • १ डाळिंब

  • दही २ कप

  • मलाई १०० ग्रॅम

  • साखर – २ चमचे

  • वेलची पावडर – अर्धा चमचा

  • सैंधव मीठ गरजेनुसार

Navratri 2023 : महानवमीला बनवा ‘हा’ स्पेशल उपवासाचा रायता, जाणून घ्या रेसिपी
Navratri 2023 : नवरात्रीसाठी देवीला दाखवा ‘या’ गोड पदार्थांचा नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी

अशा पद्धतीने बनवा फळांचा रायता :

  • सर्वात आधी सर्व फळे पाण्याने धुवून स्वच्छ करा.

  • केळीचे साल सोलून त्याचे छोटे तुकडे करा.

  • सफरचंदाचे बारीक काप करा.

  • द्राक्षे देखील अर्धी कापून घ्या.

  • खरबूज आणि काकडी देखील बारीक कापून घ्या.

  • आता एक मोठ भांड घ्या.

  • या भांड्यात दही घाला आणि त्यात मलई आणि साखर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा.

  • आता सर्व बारीक चिरून घेतलेली फळे आणि डाळिंबाचे दाणे त्या भांड्यात मिक्स करा.

  • या मिश्रणात आता वेलची पूड घाला आणि काहीवेळ थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

  • तुम्हाला हवे असल्यास त्यात तुम्ही मीठ ही घालू शकता.

  • हा फळांचा रायता तुम्ही फक्त नवरात्रीमध्ये नाही तर कोणत्याही उपवासाला बनवू शकता.

  • हा फळांचा रायता अनेक प्रकारच्या पोषकतत्वांनी समृद्ध आहे. ज्यामुळे, आपले शरीर निरोगी आणि उत्साही राहण्यास मदत मिळते.

Navratri 2023 : महानवमीला बनवा ‘हा’ स्पेशल उपवासाचा रायता, जाणून घ्या रेसिपी
Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंगदार साबुदाणा अप्पे! ही झटपट रेसिपी नक्की करा ट्राय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.