Navratri 2023 : 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. नवरात्र हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. या काळात देवी दुर्गेच्या ९ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. उपवास केले जातात. तुम्हीही नऊ दिवस उपवास करणार असाल तर उपवासाला आज आपण वेगळी साबुदाणा बर्फीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
शिंगाड्याच्या पिठाव्यतिरिक्त, उपवासात सर्वात जास्त वापरली जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे शाबुदाणा. मात्र शाबुदाणा खिचडी आणि खीर व्यतिरिक्त शाबुदाण्यापासून अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. आज आपण शाबुदाण्यापासून बर्फी तयार करूयात. जे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि उपवासाच्या वेळी वारंवार लागणारी भूकही नियंत्रणात ठेवता येते. चला तर जाणून घेऊया झटपट बनणारी ही रेसिपी.
शाबुदाणा - १ बाउल
साखर - २ चमचे
दूध - २ चमचे
तूप - १ चमचा
खोबऱ्याचा किस - १ चमचा
विलायची पावडर - १/२ चमचा
काजू - १ चमचा काजू
पिस्ता
सगळ्यात आधी शाबुदाणा भाजून घ्या. हा शाबुदाणा तेल किंवा तूपाशिवाय भाजू नका.
शाबुदाणा चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर थंड होऊ द्या.
आता यानंतर शाबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
बर्फीसाठी साखरेचीसुद्धा पावडर वापरा.
आता एका बाउलमध्ये शाबुदाणा पावडर, साखरेची पावडर, मिल्क पावडर, खोबऱ्याचा किस घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.
यात विलायची पावडरसुद्धा घाला. तुम्ही मिल्क पावडर आणि दूधाऐवजी कोकोनट किंवा बदाम मिल्कसुद्धा यूज करू शकता.
एका प्लेटमध्ये तूप लावून आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. थोड्या वेळी सेट होऊ द्या.
१०-१५ मिनिटांनी चाकूच्या मदतीने बर्फी आकारात कापून घ्या. आता वरून कापलेले ड्राय फ्रुट्स त्यावर घाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.