Food : उपासाच्या दिवशी उत्साही राहायचंय? 'या' पदार्थांचे करा सेवन

नवरात्रीच्या उत्सवात अनेकांचा उपवास असला तरी कामावर जावेच लागते. अशावेळी उत्साह टिकवण्यासाठी, जाणून घ्या आहार.
Food : उपासाच्या दिवशी उत्साही राहायचंय? 'या' पदार्थांचे करा सेवन
Updated on

Fasting Food for Keeping Stamina Up : शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या काळात अनेक भाविक आपापल्या परीने आदिशक्तीची उपासना करतात. काही जण घरात पूजा-अर्चा करतात. तर बऱ्याच जणांचे याकाळात उपवास असतात. असे असले तरी ऑफिसला जावेच लागते.

अशा परिस्थितीत उपवासात अशक्तपणा येऊ नये म्हणून काय करावे, जाणून घ्या.

Food : उपासाच्या दिवशी उत्साही राहायचंय? 'या' पदार्थांचे करा सेवन
Navratri Recipe: उपवासाला करा टेस्टी दही साबुदाणा

साबुदाणा

साबुदाण्यामुळे शरीराला इंस्टेंट एनर्जी मिळते. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. साबुदाणा खीर, वडा आणि खिचडीच्या रूपात खाता येते.

बटाटा

उपवासात बटाटे उकडून खावेत. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन आढळतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Food : उपासाच्या दिवशी उत्साही राहायचंय? 'या' पदार्थांचे करा सेवन
Navratri Recipe: चवदार मसालेदार साबुदाणा वडा कसा तयार करायचा?

मखाना

मखाना सहज पचतो आणि शरीरात ऊर्जा भरून राहते. हे तुपात भाजून खाता येते.

सैंधव मीठ

सैंधव मीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे सॅक्स किंवा कोणत्याही फळांच्या अन्नामध्ये सेवन केले जाऊ शकते.

Food : उपासाच्या दिवशी उत्साही राहायचंय? 'या' पदार्थांचे करा सेवन
Navratri Recipe: उपवासाला ट्राय करा टेस्टी बटाट्याची बर्फी

शेंगदाणे

शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

फळ

उपवासात सफरचंद, केळी यांसारखी फळे खावीत. त्यामुळे अशक्तपणा वाटणार नाही.

सुका मेवा

अशा वेळी भूक कमी करण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी सुका मेवा खावा.

दही

उपवासाच्या आहारात दह्याचा समावेश करा. दही खाल्ल्याने पोट निरोगी राहते, यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.