जर तुम्ही नॉनव्हेजचे शौकीन असाल आणि यावर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी घरी पार्टी करणार असाल तर बटर गार्लिक चिकनची ही रेसिपी तुमच्या पार्टीची मजा द्विगुणित करणार आहे. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.
याशिवाय, ही ग्लूटेन फ्री रेसिपी तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही घटकांचा वापर करून फक्त 30 मिनिटांत तयार केली जाऊ शकते. तुम्ही बटर गार्लिक चिकन भात, रोटी किंवा नूडल्ससोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग आता उशीर न करता बटर गार्लिक चिकन कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
बटर गार्लिक चिकन बनवण्यासाठी साहित्य-
500 ग्रॅम बोनलेस चिकनचे समान आकाराचे तुकडे करा
3 चमचे मध
3 चमचे लोणी
2 चमचे बारीक चिरलेला लसूण
1 टीस्पून मीठ
½ टीस्पून काळी मिरी पावडर
2 चमचे अँपल व्हिनेगर
2 चमचे ऑलिव्ह ऑइल
बटर गार्लिक चिकन कसे बनवायचे-
बटर गार्लिक चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मध, बटर, लसूण, मीठ, काळी मिरी पावडर आणि अॅपल सायडर व्हिनेगर एकत्र करून घ्या.
नतंर मीडियम हाय प्लेमवर कढईत ऑलिव्ह तेल गरम करा. पॅनमध्ये चिकनचे तुकडे घाला आणि सुमारे 5 मिनिटे शिजवा. यानंतर गॅसची फ्लेम कमी करा.
नतंर मध आणि बटरचे मिश्रण पॅनमध्ये ठेवा आणि ते चिकन सॉसमध्ये चांगले मिसळेपर्यंत ढवळत रहा.
आता 3-4 मिनिटे सतत ढवळत असताना सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा. तुमचा चविष्ट बटर गार्लिक चिकन तयार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.