फ्युजन किचन : बेसिल हुम्मस

हुम्मस एक पारंपरिक मध्यपूर्व डीप/ ‘तोंडी लावणे’चा प्रकार आहे. छोल्यांपासून बनवलेला स्प्रेड आहे. चणे/ छोले घालून बनवलेली ही सर्वांत लोकप्रिय पाककृती आहे.
basil hummus
basil hummussakal
Updated on

- नीलिमा नितीन

हुम्मस एक पारंपरिक मध्यपूर्व डीप/ ‘तोंडी लावणे’चा प्रकार आहे. छोल्यांपासून बनवलेला स्प्रेड आहे. चणे/ छोले घालून बनवलेली ही सर्वांत लोकप्रिय पाककृती आहे. ही हुम्मस रेसिपी खरोखरच चांगली आहे आणि तुम्हाला ती स्नॅकिंगसाठी नक्कीच आवडेल. हुम्मस क्रिमी, सॉफ्ट आणि माइल्ड चवीचं असतं. छोले किंवा चण्यांसह बनवलेलं असल्यानं यात प्रोटिन्स असतात.

शिजलेले छोले/ चणे, ताहिनी, लिंबाचा रस, लसूण आणि ऑलिव्ह ऑइलसह हुम्मसची रेसिपी बनविली जाते. ताहिनी ही तिळाची पेस्ट असते; पण त्या ऐवजी तुम्ही तिळाचं कूट वापरू शकता. हुम्मस बनवण्यासाठी लागणारे सर्व घटक हेल्दी असतात. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हुम्मस फलाफल पिटा ब्रेडसोबत सर्व्ह केलं जातं.

परंतु, हुम्मस घरी बनवणं अतिशय सोपं आहे आणि तुम्ही ते फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमध्ये सहजपणे बनवू शकता. मी पहिल्यांदा एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ही डिश ट्राय केली, तेव्हापासून ही माझी फेव्हरिट आहे आणि मी ती फलाफलसोबतच नव्हे, तर चक्क सॅंडविच, कच्या भाज्या- जसं की काकडी, गाजर बुडवून खाण्यासाठी, पोळीच्या रोलसाठी, ब्रेड किंवा टोस्टसाठीसुद्धा वापरते.

मी छोले बनवायचा जेव्हा जेव्हा प्लॅन करते, तेव्हा थोडे जास्त छोले भिजवते व शिजवल्यानंतर त्यातील थोडे शिजवलेले छोले हुम्मससाठी वापरते आणि हुम्मसचा एक छोटासा पोर्शन बनवते. फ्रीजमध्ये हे हुम्मस ३-४ दिवस चांगलं राहतं; परंतु हे ताजं बनवून खाणं जास्त चांगलं. आज हुम्मस आपण एका छोट्याशा ट्वीस्टनं बनवणार आहोत.

साहित्य - मीठ घालून उकडलेले छोले २ वाटी, ४ लसूण पाकळ्या, मीठ अंदाजानं (शिजवताना छोल्यात घातलेलं आहे), पाव लिंबाचा रस, १ चमचा जिरे पावडर, ४-५ चमचे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल व थोडं जास्त वरून घालण्यासाठी. पप्रिका किंवा लाल मिरची पावडर गार्निशिंगसाठी. यात थोड्या तिखटपणासाठी तुम्ही थोडी मिरपूड वापरू शकता; पण हे डीप तिखट नसतं. फ्रेश बेसिलची पानं दोन मूठभर. बेसिलमुळे यास सुंदर रंग आणि चव येते.

कृती - फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमध्ये उकडलेले छोले, लसूण, जिरे पूड, लिंबाचा रस, तहिनी पेस्ट, मीठ, ताजी बेसिल पानं, मिरपूड घालून याची क्रीमी पेस्ट बनवून घ्या. गरज वाटल्यास ऑलिव्ह ऑइलचं प्रमाण वाढवू शकता. अतिशय

कमी वेळात व परिश्रमात एक छान रेसिपी तय्यार होते. पार्टीजमध्ये सर्व्ह करण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.