South Indian Food: इडली डोसा सांबार! साऊथ इंडियन पदार्थांच्या पौष्टिकतेचं सिक्रेट काय ?

खाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा भारताकडे खूप पर्याय तयार असतात.
South Indian Foods
South Indian Foodssakal
Updated on
Summary

खाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा भारताकडे खूप पर्याय तयार असतात.

डोसा, उपमा, सांबार आणि पोंगल दक्षिणेकडील पदार्थ आहेत, तर उत्तरेकडील रोट्या आणि माखनी ग्रेव्हीज, तसेच पश्चिमेकडील फिश करी किंवा पूर्वेकडील माछा आणि ईशान्येकडील राज्यांतील स्वादिष्ट पदार्थ.

खाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा भारताकडे खूप पर्याय तयार असतात. पदार्थांची विविधता हेच भारताला खवय्यांचे आवडते ठिकाण बनवते. आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा दक्षिणेकडील पदार्थ देशाच्या इतर भागांवर वरचढ ठरतात. इतर राज्यांमध्ये आरोग्यदायी आहाराचे पर्याय असूनही, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या तयारीची शैली आणि घटक पाहता आरोग्याच्या दृष्टीने थोडे अधिक चांगले आहेत.

दक्षिणेकडील बहुतेक अन्नपदार्थ आंबवले जातात. आंबवलेले अन्न म्हणजे नक्की काय? बरं, थोडक्‍यात किण्वन म्हणजे जेव्हा यीस्टसारखे छोटे सूक्ष्मजीव किंवा बॅक्टेरिया, अन्नामध्ये असलेल्या शर्करा आणि स्टार्चचे साध्या घटकांमध्ये विघटन करतात.

उदाहरणार्थ दूध घ्या. ते गरम केले जाते आणि त्यात विशिष्ट प्रकारचे जीवाणू जोडले जातात, तेव्हा जीवाणू दुधातील शर्करा तोडतात आणि दुधाचे दह्यात रूपांतर करतात. याचा सर्वांत पहिला फायदा असा की अन्नातील घटक आधीच सूक्ष्मजंतूंद्वारे खंडित केले गेले आहेत, त्यामुळे शरीराला आंबवलेले अन्न पचविणे खूप सोपे आहे.

आरोग्याच्या बाबतीत सूक्ष्मजंतू किंवा सूक्ष्मजीव हे ‘वाईट’ नाहीत का? लोकांची सामान्य धारणा अशी आहे की सर्व सूक्ष्मजंतू केवळ आजार आणि संक्रमणास कारणीभूत असतात. आपल्या शरीरात, विशेषतः: आपल्या पोटात सुमारे १० ट्रिलियन सूक्ष्मजंतू असतात. त्यापैकी बहुतेक चांगले सूक्ष्मजंतू आहेत जे पचनास मदत करतात तर इतर खूपच निष्क्रिय असतात.

पौष्टिक आहाराचे मार्ग

आपल्या शरीरातील या चांगल्या सूक्ष्मजंतूंचे संगोपन आणि वाढ करण्यात मदत करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे आणि कोणत्याही वाईट सूक्ष्मजंतू किंवा रोगजनकांना रोखण्यासाठी तयार राहणे हे आपले कर्तव्य आहे.

ते करण्याचा मार्ग? सकस पौष्टिक आहार. हे साध्य करण्याचा उत्तम मार्ग? आपल्या आहारात आंबलेल्या पदार्थांचा समावेश करा. आंबलेल्या अन्नामध्ये तुमच्या आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची पातळी वाढवण्याची क्षमता असते जे शरीरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जंतूंना रोखण्यास मदत करतात.

याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी १, बी २, बी ३, बी ५, बी ६, बी १२ आणि पोटॅशियमच्या उत्पादनासाठी आणि संश्लेषणासाठी आंबवलेले पदार्थ आवश्यक असतात जे शरीरातील नर्व्हज निरोगी ठेवण्यासाठी, संक्रमणास प्रतिकार करण्यासाठी, अन्नातून पोषक तत्त्वे मिळवण्यासाठी आणि शरीराला कुठेतरी इजा झालेली असताना रक्तस्राव थांबवण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असतात.

परंतु हे इतकेच आहे का? फक्त किण्वनामुळे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ इतके पौष्टिक बनतात का? तर नाही, त्यांच्या पदार्थांची पौष्टिकता ते तयार करण्याच्या पद्धतीवरही आहे. उदाहरणार्थ इडली घ्या. इडली तयार करण्याबाबत एक अनोखी गोष्ट वाफवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत आहे. इडली तळलेली नसल्यामुळे त्या डिशमध्ये कुठलीही चरबी मिसळलेली नाही याची खात्री असते.

इडली शिजत असताना पाण्याच्या संपर्कात येत नाही. सामान्यतः एखादा अन्न घटक ब्लँच केला जातो तेव्हा पोषक घटक तो अन्नपदार्थ सोडतात आणि ज्या पाण्यात ते ब्लँच केले जातात त्या पाण्यात विरघळतात, ज्यामुळे त्याचे एकूण पौष्टिक मूल्य कमी होते. इडलीसारखे अन्न वाफवले असल्याने पोषक द्रव्ये टिकून राहण्याची शक्यता अधिक असते.

डोसा हा पदार्थ हेल्दी कार्बोहायड्रेट्सचे स्रोत आहे. तो वजन नियंत्रित ठेवत दिवसभर तुम्हाला ऊर्जा देतो. त्याशिवाय, त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आणि कोलेस्टेरॉलच्या समस्यांवर उपाय असल्याचे दिसून आले आहे.

तथापि, दोन महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे फायद्याचे ठरेल.

१) नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे, आणि रात्रीचे जेवण गरिबासारखे.

२) तुमची सर्व महत्त्वाची फळे आणि भाज्या खाण्यास विसरू नका.

दोन्ही जेवणाच्या मधल्या वेळात आपल्याला भूक लागल्यावर आपण काहीतरी अस्वास्थ्यकर खाण्याकडे वळतो, त्यावरही आपल्याकडे उपाय आहे!

तुम्‍ही त्या वेळातील क्रेविंग भागविण्याचा विचार करत

असल्‍यास, भाजलेले चणे हा सर्वोत्‍तम पदार्थांपैकी एक आहेत. चवीबरोबर प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उच्च स्रोत आहेत. बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थांत नारळाचा भरपूर वापर असतो. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेल्या ताज्या नारळाचे पाणी त्यांच्या सर्वात नैसर्गिक स्वरूपात पिणे हे आरोग्यासाठी उत्तम आणि ताजेतवाने करणारे आहे.

विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.