ओट्स की कॉर्न फ्लेक्स! नाश्त्यासाठी योग्य पौष्टीक पर्याय कोणता?

झटपट करता येत असल्याने अनेक घरात हे पदार्थ केले जातात
Weight Loss Brekfast
Weight Loss Brekfast
Updated on

Oats And Corn Flex Breakfast: रोजच्या नाश्त्यासाठी काय करायचं हा कधीकधी अनेकांना प्रश्न पडतो. रोजच्या धावपळीत हेल्दी पदार्थ (Food) करणं जमतचं असं नाही. ऑफिसमधे (Office) जाणाऱ्या लोकांची तर खुपच तारांबळ उडते. अशावेळी लोक झटपट तयार होणारे पदार्थ करण्याला प्राधान्य देतात. आजकाल अनेक लोकं नाश्त्याला ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्स खातात. हे पदार्थ तयार करण्यासाठी वेळ अतिशय कमी लागतो. तसेच हेल्दी ब्रेकफास्ट (Breakfast) म्हणून याकडे पाहिले जाते. जे लोकं डाएट (Diet) करतात ते ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स सहज खाऊ शकतात. पण या दोघांमध्ये सर्वात जास्त पौष्टीक पदार्थ कोणता हे समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला ओट्स (Oats) किंवा कॉर्न फ्लेक्स (Corn Flakes) यापैकी कोणता पदार्थ खाल्ल्याने अधिक फायदा मिळतो ते जाणून घ्या.

Weight Loss Brekfast
व्यायाम- खाण्यादरम्यान नेमकं किती अंतर असावं? जाणून घ्या
कॉर्नफ्लेक्स
कॉर्नफ्लेक्स

कॉर्न फ्लेक्सचे पोषण मूल्य-

कॉर्न फ्लेक्स मक्यापासून तयार केले जाताता. 100 ग्रॅम कॉर्न फ्लेक्समध्ये 0.4 ग्रॅम फॅट, 84 ग्रॅम कार्ब, 7.5 ग्रॅम प्रोटीन, 1.2 ग्रॅम फायबर, 2% कॅल्शियम आणि एकूण 378 कॅलरीज असतात.

कॉर्न फ्लेक्स खाण्याचे फायदे

१) कॉर्न फ्लेक्स हृदयासाठी अत्यंत चांगले आहे. यात कॉलेस्टरॉल आणि फॅटही कमी असते.

२) कॉर्न फ्लेक्स दुधाबरोबर खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. यात तुम्ही मध आणि बदाम एकत्र करून खाऊ शकता. कॉर्न फ्लेक्समुळे फुफ्फुसही निरोगी राहतात.

३) कॉर्न फ्लेक्स डायटिंग किंवा वजन वाढवणार्‍यांसाठी चांगला नाश्ता आहे. यात कॅलरीज कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कॉर्न फ्लेक्स खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही.

Weight Loss Brekfast
Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी
फ्लेवर्ड ओट्स
फ्लेवर्ड ओट्स

ओट्सचे पोषण मूल्य-

ओट्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. तसेच त्यात बीटा ग्लुकन असते. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समध्ये 10.8 ग्रॅम फॅट, 26.4 ग्रॅम प्रथिने, 16.5 ग्रॅम फायबर, 103 ग्रॅम कार्ब, 8% कॅल्शियम आणि एकूण 607 कॅलरीज असतात.

ओट्स खाण्याचे फायदे

१) ओट्समध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने चयापचय क्रिया गतिमान होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

२) नाश्त्याला ओट्स खाल्ल्यामुळे खूप काळ भूक लागत नाही. पोटही भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.

३) ओट्स हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूड मानले जाते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच हृदय राहते. नियमित ज्यूससोबत ओट्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही कमी होते.

Weight Loss Brekfast
मेंदू कार्यक्षम होण्यासाठी 'हे' नऊ पदार्थ खा!
BreakFast
BreakFastesakal

यापैकी पौष्टीक पदार्थ कोणता?

नाश्त्यासाठी ओट्स आणि कॉर्न फ्लेक्स हे चांगले पर्याय आहेत. पण शारीरिकदृष्ट्या सक्रीय असलेल्या लोकांसाठी कॉर्न फ्लेक्स खाणे चांगले असते. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर ओट्स खाणे अधिक चांगले. आतड्यांसंबधी समस्या असतील तर ओट्स खाताना काळजी घेणे आवश्यक आहे, कारण ओट्समध्ये जास्त फायबर असते, अशाने पोट खराब होऊ शकते.

Weight Loss Brekfast
नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()