Food : रेस्टॉरंट स्टाईलचे कुरकुरीत पालक पत्ता चाट, घरीच बनवा सोपी रेसिपी

पालकच्या पानांवर बेसनाच्या पिठाचा लेप करून, तळून हा पदार्थ तयार केला जातो.
palak patta chaat recipe
palak patta chaat recipe
Updated on
Summary

पालकच्या पानांवर बेसनाच्या पिठाचा लेप करून, तळून हा पदार्थ तयार केला जातो.

पालक पत्ता ही चाट रेसिपी चवीला बेस्ट आहे. सायंकाळच्या चहासोबत तुम्ही एक उत्तम नाश्ता रेसिपी म्हणून याकडे पाहू शकता. पालकच्या पानांवर बेसनाच्या पिठाचा लेप करून, तळून हा पदार्थ तयार केला जातो. घरातील लहानगी सहसा पालकची भाजी खाताना नाक मुरडतात, मात्र पालक हा आरोग्यासाठी उत्तम आहे. (palak patta chaat recipe)

पालकाच्या अशा हटके रेसिपीचा पदार्थ तुम्ही लहानांना खाऊ घातला तर हिंडत फिरत ते पालक पत्ता खाऊ शकतात. दही, चटणी आणि कोणत्याही मसाल्यासोबत ही पालक पत्त्याची रेसिपी सर्व्ह केली जाऊ शकते. तुम्हाला काही वेगळ्या रेसिपीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. चला तर जाणून घेऊया कशी बनवायची पालक पत्ता चाट रेसिपी..

palak patta chaat recipe
Health News : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? कोणते उपाय कराल पहा..

रेसिपीसाठी लागणारे साहित्य

  • 1 कप बेसन

  • 1 टीस्पून मीठ

  • 1/2 टीस्पून ओवा

  • 2 कप पाणी

  • एक चिमूटभर हळद

  • 7-8 पालकाची पाने

  • 4 चमचे दही

  • एक चिमूटभर काळे मीठ

  • एक चिमूटभर जिरे

  • चिमूटभर लाल तिखट

  • 2 टीस्पून कांदा, चिरलेला

  • 2 टीस्पून टोमॅटो चिरलेला

  • 1 हिरवी मिरची 2 टीस्पून

  • चिंचेची चटणी

  • 2 चमचे पुदिन्याची चटणी

  • 1 टीस्पून बुंदी

  • 1 टीस्पून डाळिंब

  • 1 टीस्पून शेव

कृती -

एका भांड्यात एक वाटी बेसन घेवून त्यात मीठ, पाणी टाका. गुळगुळीत आणि हलके पातळ पीठ बनवण्यासाठी ते फेटून घ्या. आवश्यक असल्यास आणखी थोडे पाणी त्यात टाका. या मिश्रणात चिमूटभर हळद टाकून पुन्हा एकत्र मिसळा. यानंतर ताजी आणि स्वच्छ पालकाची पाने भिजवून घ्या आणि बेसनाच्या मिश्रणाने पूर्णपणे लेपून टाका. आता पॅनमध्ये तेल टाका, ही पाने तळण्यासाठी पॅनमध्ये ठेवा.

palak patta chaat recipe
Recipe : रेड वेल्वेट बॉल्सची सोपी रेसिपी; घरीच ट्राय करा, मुलांनाही आवडेल

तळलेली, कुरकुरीत पालकाची पाने एका प्लेटवर ठेवा आणि त्यावर थोडे दही घाला. सर्व मसाले आणि चटण्या घेवून ती डिश सजवा. एकावेळी एक मसाला घाला. सुरुवातीला काळे मीठ, जिरे आणि लाल तिखट, त्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी टाका. आपण आपल्या चवीनुसार मसाल्यांचे प्रमाण वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.