Paneer Corn Salad : जेवणाच्या थाळीचा स्वाद वाढवेल अशी टेस्टी आणि हेल्दी सॅलड रेसिपी

शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी चांगला आहार घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाच
Paneer Corn Salad
Paneer Corn Saladesakal
Updated on

Paneer Corn Salad : हिवाळा सुरू आहे आणि हळूहळू थंडी आणखी वाढताना दिसते आहे. अशा परिस्थितीत शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी चांगला आहार घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाच आहे. विशेषत: अशा गोष्टींचा आहारात समावेश करा, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

Paneer Corn Salad
Love Life : ब्रेकअप नंतर काही लोक यशस्वी का होतात?

आपण आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी चिकन, सूप किंवा व्हेज पदार्थ इत्यादी अनेक मांसाहारी पदार्थांचा समावेश करतो. पण जर एवढ काही करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही साधं सॅलड खाऊनही आपल्या शरीराला उब देऊ शकतात. शिवाय यात कॉर्न आणि पनीर असल्यामुळे सगळ्यांनाच ते खायला आवडतील.

Paneer Corn Salad
Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

साहित्य :

- 200 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे

- 150 ग्रॅम पनीर

- 150 ग्रॅम उभा पातळ चिरलेला कोबी

- 1 उभी पातळ चिरलेली शिमला मिरची

- 1 टेबलस्पून बटर

- 1 टेबलस्पून लिंबाचा रस

- अर्धा टीस्पून काळी मिरी पूड

- सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

Paneer Corn Salad
Coffee Recipe : घरच्या घरी कशी तयार कराल कॅफे स्टाइल कॉफी ?

कृती

1. कोबी गरम पाण्यात मीठ घालून उकळून घ्या.

2. एका पॅनमध्ये बटर घालून शिमला मिरची परतवा. मिरची थोडी नरम झाल्यावर गॅस बंद करा.

3. आता पनीरचे बारीक तुकडे करून घ्या.

4. एका बाउलमध्ये पनीर, कॉर्न, शिमला मिरची, कोबी टाकून छान मिक्स करा.

5. आता त्यात काळी मिरी पूड घाला, थोडसं मीठ घाला आणि एकत्र करून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()