Bajra Cake Recipe : व्हाइट हाऊसमध्ये पीएम मोदींसाठी बनवलेला खास बाजरा केक घरी कसा बनवाल? नोट करा रेसिपी

व्हाइट हाऊसमध्ये भारतीय पदार्थांपासून बनलेली ही चविष्ट डिश तुम्हालाही घरबसल्या बनवायची असेल तर लगेच नोट करा ही रेसिपी
Bajra Cake Recipe
Bajra Cake Recipeesakal
Updated on

Homemade Bajra Cake Recipe : पीएम मोदींचे यूएसमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतात कुठलीही कसर उरलेली नव्हती. यावेळी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी मोंदीसाठी ठेवलेल्या खास मेजवाणीत खास बाजऱ्याचा केक होता. व्हाइट हाऊसमध्ये भारतीय पदार्थांपासून बनलेली ही चविष्ट डिश तुम्हालाही घरबसल्या बनवायची असेल तर लगेच नोट करा ही रेसिपी.

केकसाठी लागणारी सामग्री

3/4 कप बाजरी

½ कप दूध

250 ग्रॅम खजूर

½ कप ओट्स

बेकिंग पावडर, इसेंस (PM Modi In US)

Bajra Cake Recipe
Coconut Sooji Cake : असा चमचमीत केक खाल तर मैद्याचा केक कायमचा विसराल, वाचा रेसिपी

रेसिपी

ज्याप्रकारे केक बनवण्यासाठी ओव्हन प्रीहीट केले जाते, त्याच प्रकारे ओव्हन प्रीहीट करून ठेवा.

एक तवा घ्या आणि त्यात बाजरीचे पीठ मिक्स करा. ओट्स बारीक करून घ्या आणि बाजरीमध्ये चांगले मिसळा. त्यात बेकिंग पावडर मिसळा. लक्षात ठेवा बेकिंग पावडर चाळूनच त्यात मिसळा.

खजुराच्या बिया काढून मिक्सरमध्ये बारीक करा. आणि तयार झालेली पेस्ट नंतर दुधात चांगली मिसळून घ्या. (Homemade Bajra Cake Recipe)

Bajra Cake Recipe
PM Modi in US Congress: PM मोदींनी US House मध्ये समोसा कॉकसचा उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट का झाला?

आता बाजरी आणि ओट्सच्या पिठात खजूर मिसळलेले दूध मिसळा आणि चमच्याच्या मदतीने सगळं मिसळून घ्या. (Recipe)

केक सारखे पीठ तयार झाल्यावर त्यात हलका इसेन्स घालून ते मिसळून घ्या.

जर तुम्हाला जास्त मऊ केक हवा असेल तर तुम्ही थोडे दहीही मिक्स करू शकता.

आता हे बॅटर एका ग्रीस केलेल्या पॅनमध्ये ठेवत ओव्हनमध्ये ठेवा आणि किमान वीस ते तीस मिनिटे शिजू द्या.

केक थंड झाल्यावर पॅनमधून काढून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.