औरंगाबाद : अनेक जण अंडे, चिकन यासारखे मांसाहार करित असतात. तसेच श्रावण जवळ आल्याने बहुतेक जणांचा शुद्ध शाकाहारी खाण्याकडे कल असतो. मग ती त्यासाठी आवडीचे पदार्थ शोधायला लागतात. आम्ही तुम्हाला बटाटा ऑम्लेटविषयी (potato omelette recipe in marathi) सांगणार आहोत. ते नक्की आवडेल तुम्हाला. बऱ्याच जणांनी बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतील. मात्र बटाटा ऑम्लेट नवीनच असेल. यात अंड्यांचा वापर केला जात नाही. हे शुद्ध शाकाहारी असून तुम्ही सकाळी नाष्ट्यात बटाटा ऑम्लेट खाऊ शकता.
साहित्य
- २-३ बटाटे
- १ कांदा
- १ छोटा टोमॅटो
- थोडेसे बेसण
- मीठ आणि काळी मिरची चवीनुसार
- तळण्यासाठी थोडेसे तेल
कृती
- सर्वप्रथम बटाटा किसून घ्या.
- त्यानंतर काही वेळे करिता थंड पाण्यात ते ठेवा. त्याने स्टार्च निघून जाईल.
- आता ऑम्लेटचे सर्व साहित्य एकत्र करुन घ्या.
- त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात ऑम्लेटच्या आकारात पीठ पसरुन घ्या.
- दोन्ही बाजूकडून तळून घ्या. वरुन चीज टाका. आता खाण्यासाठी बटाटा ऑम्लेट तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.