Pumpkin Chips Recipe : भोपळा हृदयरोगींसाठी अत्यंत लाभदायक आहे. तो कोलेस्ट्राल कमी करताे, हा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. तसेच पोटाच्या गड़बड़ी कमी करणारा आहे.
रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करताे आणि अग्न्याशयला सक्रिय करताे या मुळे चिकित्सक मधुमेह रूग्णांसाठी भोपळा खाण्याचे सल्ला देतात. याचे रस पण स्वास्थ्यवर्धक मानला जातो. भोपळ्यात मुख्यतः बीटा केरोटीन असते, ज्यामुळे विटामिन ए मिळते.
पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीनचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याचे बी पण आयरन, जिंक, पोटेशियम आणि मैग्नीशियमचे चांगले स्रोत आहे. जग भरात याचा उपयोग केला जातो त्यामुळे २९ सप्टेंबरला 'पंपकिन डे' म्हणून साजरा केला जातो.
आज आम्ही तुमच्यासाठी गोड भोपळ्याच्या चिप्स बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. या चिप्स गुळाच्या मदतीने बनवल्या जातात, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यासोबतच या चिप्स स्वादिष्ट तसेच बनवायला अगदी सोप्या आहेत.
भोपळा ही अशी भाजी आहे ज्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन-सी सारखे गुणधर्म आहेत. लोक सहसा स्मूदी, शेक, चटणी किंवा भाजी करून भोपळा खायला आवडतात.
पण तुम्ही कधी गोड भोपळ्याच्या चिप्सचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर आज आम्ही घेऊन आलो आहोत गोड भोपळ्याच्या चिप्स बनवण्याची रेसिपी.
भोपळ्यातील गुणधर्म तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. ज्यामुळे तुम्ही खोकला आणि सर्दी सारख्या समस्या टाळता येतात. यासोबतच या चिप्स स्वादिष्ट आहेत तसेच बनवायला अगदी सोप्या आहेत, चला तर मग जाणून घेऊया गोड भोपळ्याच्या चिप्स कसे बनवायचे.
गोड भोपळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
भोपळा १
तांदळाचे पीठ १ वाटी
तळण्यासाठी तेल
गूळ पावडर २ टीस्पून
कृती
गोड भोपळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी प्रथम भोपळा घ्या आणि चिप्सच्या आकारात पातळ कापून घ्या.
नंतर भोपळ्याचे तुकडे उकळत्या पाण्यात किंवा कोमट पाण्यात टाका.
यानंतर, हे तुकडे मऊ होण्यासाठी पाण्यात चांगले बुडवा आणि सुमारे 2 मिनिटांनी बाहेर काढा.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाच्या पाण्यात भोपळ्याचे तुकडेही शिजवू शकता.
नंतर साधारण 2 ते 5 मिनिटांनी भोपळा एका कागदावर अलगद ठेवून वाळवा.
यानंतर कढईत तेल तळण्यासाठी ठेवा आणि गरम करण्यासाठी ठेवा.
नंतर भोपळा चांगला सुकल्यावर गरम तेलात एक एक करून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
यानंतर या चिप्स टिश्यू पेपरवर काढून ठेवा.
आता तुमच्या गोड भोपळ्याच्या चिप्स तयार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.