अत्यंत सोप्या पध्दतीने बनवा स्वादिष्ट शाबुदाण्याची खीर

quick make Sabudana Kheer pudding recipe tips food marathi news
quick make Sabudana Kheer pudding recipe tips food marathi news
Updated on

कोल्हापूर: सण वार उपवास आणि शाबुदाणा  हे जणू समीकरणच. आपल्या भारत देशात उपवासादिवशी शक्यतो प्रत्येक घरात शाबुदाणा खिचडी बनवली जाते.   याचवबरोबर साबुदाण्याची खीर  देखिल उपवासा दिवशी अनेक ठिकाणी बनवली जाते.
 खीर हा दुधाचा पदार्थ असल्यामुळे तो फसू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शाबू खिर कशी बनवावी याच्या काही टिप्स देणार आहोत.साबुदाणा मध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या उपवासाच्या वेळी आपल्याला भरपूर ऊर्जा देत राहतात

लागणारे साहित्य 

*पाव कप शाबुदाणा 
*अर्धा लिटर थंड दूध 
अर्धा कप साखर, 
तीन केसर 

*एक लहान चमचा हिरवा वेलदोडा 

*जरुरीनुसार काजू  आणि बदाम 

* आवश्यकतेनुसार 

अशी बनवा खीर

-एका बाऊलमध्ये शाबुदाना घ्या व तो चांगल्या पद्धतीने पाण्याने धुऊन घ्या. यामुळे साबुदाणा  मध्ये असलेले सर्व स्टार्च पाण्याबरोबर चांगल्या पद्धतीने निघून जाईल. त्यानंतर  पाणी बाहेर काढा आणि पुन्हा पाणी घालून एक तास साबुदाणा भिजवून घ्या.

-थोडीसे पाणी घ्या आणि त्यामध्ये दुध घाला. दूध आणि पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्या.

-भिजत घातलेल्या शाबुदाणातील पाणी बाहेर काढा आणि त्यानंतर हा शाबुदाणा हळूहळू  दुधामध्ये घाला. हे मिश्रण पाच मिनिटे चांगल्या पद्धतीने शिजवून घ्या. चमचाच्या साह्याने दोन-तीन शाबुदाणे बाहेर घेऊन ते चांगल्या पद्धतीने शिजले आहे की नाही हे पहा. मिश्रण तयार करताना याची काळजी घ्या की ते अधिक घट्ट होणार नाही.

दोन-तीन मिनिटे हे मिश्रण चांगले उकळू द्या चमच्याच्या सहाय्याने ते हलवत रहा. त्यानंतर साखर टाकून पुन्हा चमच्याचे सहाय्याने ते हलवा. त्यानंतर त्यावरती वेलदोड्याची पावडर आणि केसर टाका.

सर्व मिश्रण उकळून घेताना ते जादा घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. चांगल्या पद्धतीने शिजलेली खीर आता गॅस वरून खाली घ्या. आता आपली स्वादिष्ट अशी साबुदाण्याची खीर तयार झाली आहे. ही  खिर आपण थंड अथवा गरम सुद्धा खाण्यासाठी देऊ शकतो. खिर खाण्यास देण्यापूर्वी त्यामध्ये काजू आणि बदाम चे बारीक तुकडे करून  घालू शकता.


 भारतामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली शाबुदाण्याची खिर आपण सहजपणे तयार करू शकतो आणि त्याची चवही अत्यंत स्वादिष्ट अशी असते. साबुदाणा मध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या उपवासाच्या वेळी आपल्याला भरपूर ऊर्जा देत राहतात. उपवासा दिवशी दिवसभर तुम्हाला जर ताजेतवाने राहायचे असेल तर साबुदाण्याची खीर स्वतः बनवा आणि आपल्या परिवारा समवेत खाण्याचा आनंद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.