Eid Special Recipe 2024 : ईदनिमित्त घरच्या घरी झटपट बनवा शीर-खुरमा, चवीला लागतो एकदम बेस्ट, वाचा सोपी रेसिपी

Eid Special Recipe 2024 : ईदच्या निमित्ताने घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.
Eid Special Recipe 2024
Eid Special Recipe 2024esakal
Updated on

Eid Special Recipe 2024 : देशभरात आज ईदचा उत्साह पहायला मिळतोय. इस्लाम धर्माचा हा विशेष सण समता आणि बंधुतेची आपणा सर्वांना शिकवण देतो. रमजाननंतर लोक ईद-उल-फित्रची आतुरतेने वाट पाहतात. ईदच्या निमित्ताने घरोघरी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.

गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची आज छान मेजवानी असते. खास करून गोड पदार्थ बनवण्यावर भर दिला जातो. ईदच्या दिवशी न चुकता बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शीर-खुरमा होय. त्यामुळे, आज खास करून शीर-खुरम्याचा बेत आखला जातो.

जर तुम्हाला ही आज हा पदार्थ बनवून पाहुण्यांचे तोंड गोड करायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला शीर-खुरम्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही सोपी रेसिपी.

Eid Special Recipe 2024
Dahivade Recipe : नाश्त्यासाठी दहीवडे आहे हेल्दी ऑप्शन, पण ते हॉटेलसारखे सॉफ्टच होत नाहीत? या ट्रिक्स वापरून पहा

शीर-खुरमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • शेवया – २०० ग्रॅम

  • दूध – 2 लीटर

  • केशर – चिमूटभर

  • वेलची – ४-५

  • साखर – २ कप

  • काजू - १०

  • पिस्ता -१०

  • बदाम – १०

  • तूप (आवश्यकतेनुसार)

शीर-खुरमा बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे :

  • शीर-खुरमा बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये शेवया तूपात भाजून घ्या.

  • शेवयांचा कलर सोनेरी झाला की, त्या एका बाऊलमध्ये काढून घ्या.

  • आता एका खोलगट भांड्यात दूध उकळायला ठेवा. दुधाला पहिली उकळी आल्यावर त्यात वेलची आणि केशर टाका.

  • त्यानंतर, दूध निम्मे होईपर्यंत उकळवा. आता या दुधात चवीनुसार साखर घाला आणि मिश्रण चांगले शिजू द्या.

  • मोठ्या पळीने हे दूध ढवळत राहा. या दरम्यान, बदाम, काजू आणि पिस्त्याचे बारीक काप करा.

  • दूध चांगले उकळल्यानंतर त्यात भाजलेल्या शेवया घाला आणि पुन्हा दुधाचे मिश्रण एकजीव करून घ्या.

  • त्यानंतर, १० मिनिटे हे मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करा. तुमचा गरमागरम शीर-खुरमा तयार आहे.

  • तुम्हाला गरम शीर-खुरमा खायला असेल तर तुम्ही लगेच खायला घ्या.

  • जर तुम्हाला थंडगार शीर-खुरमा खायला आवडत असेल तर १ तासासाठी हा शीर-खुरमा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. त्यानंतर, सर्व्ह करा.

Eid Special Recipe 2024
Beetroot Dosa Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी गुलाबी डोसा, पोट ही भरणार अन् चवदारही होणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.