matar sample
matar sampleeskal

मटार सॅंपल खाल्लत का? नाश्त्यासाठी आहे मस्त पदार्थ

हिवाळा असल्याने सध्या मटार मुबलक प्रमाणात मिळत आहेत
Published on

हिवाळा असल्याने सध्या मटार मुबलक प्रमाणात आणि ताजे मिळत आहेत. अनेक घरात या काळात भरपूर मटार (Matar) आणून ते सोलून फ्रिजमध्ये भरून ठेवले जातात. मग मटार पॅटीस, मटार उसळ, मटार कचोरी, मटार भात असे भरपूर पदार्थ (Food)केले जातात. रोज नाश्त्याला (Breakfast) काय करायचं असा प्रश्नही पडतोच. अशावेळी तुम्ही मटार सॅंपल करू शकता. ही भाजी ब्रेडबरोबर खायला मजा येते. तुम्ही पोळीबरोबरही हा पदार्थ खाऊ शकता.

matar sample
Cholesterolचं प्रमाण कमी करायचंय! 'हे' पाच पदार्थ खाणे टाळा

साहित्य- २ मोठ्या वाट्या मटार, आवडीप्रमाणे ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, फोडणीचे नेहमीचे साहित्य, तेल

कृती- मटार कुकरमध्ये बोटचेपे शिजवावेत. मिक्सरमधून ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची हे वाटून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. त्यात वरील वाटण चांगले खमंग परतून घ्यावे. परतल्यावर त्यात मटार घालून आवडीप्रमाणे पाणी घालावे. मग मीठ, साखर घालून चांगली उकळी आणावी. सॅपलचा रस्सा जेवढा हवा तेवढा झाला की गॅस बंद करून गरमागरम मटार सॅंपल ब्रेडबरोबर खायला द्यावे.

matar sample
बटाटा खाल्ल्यामुळे वजन होते कमी! कसे ते जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.