Broccoli Spinach Cheela Recipe : नाश्त्यात बनवा पालक- ब्रोकोली चीला! मुलेही होतील खूश..

ब्रोकोली-पालक चिला मुलांसाठी चविष्ट तर असेलच पण त्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.
Broccoli Spinach Cheela Recipe
Broccoli Spinach Cheela Recipesakal
Updated on

जर तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्टने दिवसाची सुरुवात करायची असेल, तर ब्रोकोली-पालक चीला हा उत्तम पर्याय असू शकतो. ब्रोकोली आणि पालक दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. या दोन्ही भाज्या एकत्र करून तयार केलेला चीला पोषक तत्वांनी भरपूर आहे. साधारणपणे घरातील मुले ब्रोकोली किंवा पालक सारख्या भाज्या खाणे टाळतात.

अशा स्थितीत या भाज्यांचे पोषण मुलांपर्यंत कसे पोहोचेल, याची चिंता पालकांना सतावत आहे. तुम्हाला हवे असल्यास ब्रोकोली-पालक चीला बनवून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. ब्रोकोली-पालक चिला मुलांसाठी चविष्ट तर असेलच पण त्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. ही रेसिपी बनवणे अगदी सोपी आहे आणि ती कमी वेळात तयार होते.

ब्रोकोली पालक चीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ब्रोकोली - 1 कप

  • पालक - 1 कप

  • बेसन - 1 कप

  • लसूण पाकळ्या – 5

  • हिरवी मिरची - 2

  • जिरे पावडर - 1 टीस्पून

  • काळी मिरी पावडर - 1/4 टीस्पून

  • गरम मसाला - 1/4 टीस्पून

  • तेल - 2 चमचे

  • मीठ

Broccoli Spinach Cheela Recipe
Makhana Bhel Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मखाना भेळ', ही आहे सोपी रेसिपी

ब्रोकोली पालक चीला कसा बनवायचा

ब्रोकोली पालक चीला बनवण्यासाठी प्रथम ब्रोकोली आणि पालक स्वच्छ पाण्याने धुवा, नंतर त्यांचे लहान तुकडे करा. आता ब्रोकोली आणि पालक दोन्ही मिक्सरमध्ये टाका. त्यात लसूण पाकळ्या, हिरवी मिरची घालून 2-3 चमचे पाणी मिसळा. यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घट्ट पेस्ट तयार करा. आता तयार केलेली पेस्ट काढा आणि एका भांड्यात ठेवा.

या ब्रोकोली-पालक मिश्रणात बेसन घालून चांगले मिक्स करा. नंतर या पेस्टमध्ये जिरेपूड, गरम मसाला, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. आता या पेस्टमध्ये थोडं थोडं पाणी घालून चीला सारखे पीठ तयार करा. लक्षात ठेवा की पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.

आता नॉनस्टिक पॅन घ्या आणि गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. तव्यावर थोडं तेल टाका आणि सगळीकडे पसरवा. आता पीठ घ्या आणि पॅनच्या मध्यभागी टाकून गोलाकार आकारात पसरवा. चीला दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर चीला प्लेटमध्ये काढा. आता चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.

Chitra kode:

Related Stories

No stories found.