Corn Appe Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी 'कॉर्न आप्पे', ही आहे सोपी रेसिपी..

Breakfast Recipe of Corn Appe: जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर कॉर्न आप्पे एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे.
Corn Appe Recipe
Corn Appe Recipesakal
Updated on

साउथ इंडियन फूडमध्ये आप्पे अनेकांना आवडतात. काही लोक नाश्त्यात आप्पे आवडीने खातात. पारंपारिक आप्पे तर अनेकांना आवडतातच पण मक्यापासून बनवलेले आप्पे देखील मोठ्या थाटामाटात खाल्ले जाते. हे सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून सर्व्ह केले जाऊ शकते. कॉर्न आप्पे डिशची खासियत म्हणजे लहान मुले असोत वा प्रौढ, सर्वजण ते मोठ्या उत्साहाने खातात.

जर तुम्हालाही दिवसाची सुरुवात चवदार आणि आरोग्यदायी नाश्त्याने करायची असेल, तर कॉर्न आप्पे एक परिपूर्ण खाद्यपदार्थ आहे. हे बनवायला खूप सोपे आहे. चला जाणून घेऊया कॉर्न आप्पे बनवण्याची रेसिपी.

कॉर्न आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा - 2 कप

कॉर्न - 1 कप

ताक - 1 ग्लास

चिरलेला कांदा – 1

हिरवी मिरची चिरलेली – 2

कोथिंबीर

टोमॅटो चिरून - 1

लाल मिर्च पावडर - 1/4 टीस्पून

जिरे - 1/2 टीस्पून

बेकिंग सोडा - आवश्यकतेनुसार

तेल - 1 टेबलस्पून

मीठ - चवीनुसार

पाणी - गरजेनुसार

Corn Appe Recipe
Makhana Bhel Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मखाना भेळ', ही आहे सोपी रेसिपी

कॉर्न आप्पे कसे बनवायचे

कॉर्न आप्पे बनवण्यासाठी प्रथम एक मोठे भांडे घ्या आणि त्यात रवा घाला. यानंतर रव्यात ताक आणि चवीनुसार मीठ टाकून चमच्याने चांगले मिसळा. आता भांडे झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, कॉर्न, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून मिक्स करा.

यानंतर या मिश्रणात लाल तिखट आणि जिरे घाला. शेवटी मिश्रणात बेकिंग सोडा मिसळा. आता आप्पे बनवण्यासाठी भांडे घ्या आणि तेल लावा. आता तयार केलेले पीठ चमच्याच्या साहाय्याने आप्पे पॉटमध्ये घाला. नंतर झाकण उघडा, आप्पे उलटा आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा 2-3 मिनिटे शिजवा. चविष्ट कॉर्न आप्पे तयार आहे. नाश्त्यात त्यांना चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Crossword Mini:

Related Stories

No stories found.