Diwali Festival : हलवाई पद्धतीचे बुंदी लाडू; जाणून घ्या रेसिपी

the recipe of halwai sweet bundi laddu easy steps for women at home in kolhapur
the recipe of halwai sweet bundi laddu easy steps for women at home in kolhapur
Updated on

कोल्हापूर : भारतामध्ये अनेक प्रकारचे लाडू अनेक प्रदेशांमध्ये तयार केले जातात. प्राचीन मिठाईमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. अनेक प्रकारे आपण हे लाडू तयार करू शकतो. मसाले, जडी-बुटी, विविध पीठ, दूध, ड्रायफ्रुट्स हे सर्व पदार्थ लाडू तयार करण्यासाठी वापरले जातात. यामध्ये बुंदीचे लाडू हा भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. प्रत्येक मिठाई किंवा हलवाईच्या दुकानात तुम्हाला हा पदार्थ नजरेस पडतोच. आणि त्यामुळेच कदाचित याला कोणी घरी ज्यादा तर तयार करत नाही. परंतु तुम्हाला माहीत नसेल फक्त सहा प्रकारच्या साहित्यात काही मिनिटात तुम्ही तुमच्या आवडता बुंदीचा लाडू तयार करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. चला तर मग आपण आता जाणून घेऊया..

कृती 

एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये तूप ॲड करा. आणि हे मिश्रण एकत्र करा. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घाला. जोवर तुम्हाला एक बेटर पातळ मिश्रण मिळत नाहीत तोवर त्याला एकत्र करून घ्या आणि थोड्यावेळाने ते वेगळे ठेवा. पापड बनवण्यासाठी साखर घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला. आणि ते उकळून घ्या. केसर, इलायची हे दोन्ही एकत्र करून तो पाक गरम करण्यास ठेवा. आणि तो तयार झाल्यावर त्याला वेगळा ठेवा. आता दुसऱ्या पॅनमध्ये ते तूप गरम करा. त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रुट्स टाका. त्याचा वास येईपर्यंत ते भाजून घ्या.

आता बुंदी तयार करूयात. एका कढईत तेल गरम करा. बूंदीचा झारा घेऊन त्यामध्ये बेसण पीठ घाला. आणि बुंदीचा झारातून त्या छिद्रातून ते पीठ त्या तेलात टाका. ती बुंदी तेलात तळून निघाल्यानंतर कुरकुरीत होईल. आताही बुंदी मध्ये भाजलेले सुका मेवा टाका आणि मिक्स करा. या मिश्रणाला तयार पाकात टाका आणि एका चमच्याने मिश्रण एकत्रित करुन घ्या. यानंतक पंधरा मिनिटांसाठी सोडून ओल्या हाताचा उपयोग करून गोल गोल बॉलसारखे लाडू तयार करा. तुमचे गोड लाडू तयार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.