Makhana Bhel Recipe: नाश्त्यासाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी 'मखाना भेळ', ही आहे सोपी रेसिपी

तुम्ही मखाना भेळ तयार करून कधीही खाऊ शकता. ही एक फूड रेसिपी आहे जी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते.
Makhana Bhel
Makhana Bhelsakal
Updated on

मखाना आरोग्यासाठी जितका फायदेशीर आहे तितकीच मखाना भेळ देखील फायदेशीर आहे. मखाना अनेक प्रकारे वापरला जात असला तरी त्यापासून बनवलेली भेळही अतिशय चवदार असते. मुरमुरेपासून बनवलेली भेळ तुम्ही अनेकदा चाखली असेलच, पण जर तुम्हाला स्नॅक्स म्हणून काहीतरी वेगळं आणि नवीन चाखायचं असेल तर तुम्ही मखाना भेळ ट्राय करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की मखाना अनेक आजारांवर फायदेशीर आहे. तुम्ही मखाना भेळ तयार करून कधीही खाऊ शकता. ही एक फूड रेसिपी आहे जी काही मिनिटांत तयार केली जाऊ शकते.

मखाना भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मखाना - 2 कप

शेंगदाणे - 1/2 कप

बारीक चिरलेला कांदा – 1/2 कप

गाजर बारीक चिरून - 1/2 कप

बारीक चिरलेले बीटरूट - 1/2 कप

बारीक चिरलेले टोमॅटो - 1/2 कप

हिरवी मिरची चिरलेली – 2

कोथिंबीर चिरलेली – 1/4 कप

लाल तिखट - 1/4 टीस्पून

चाट मसाला - 1/2 टीस्पून

तूप - 3-4 टीस्पून

हिरवी चटणी - आवश्यकतेनुसार

चिंचेची चटणी - आवश्यकतेनुसार

शेव - 1/4 कप

मीठ - चवीनुसार

Makhana Bhel
Masala Omelette Recipe : नाश्त्यासाठी बनवा हेल्दी 'मसाला ऑम्लेट', जाणून घ्या सोपी रेसिपी

मखाना भेळ कशी बनवायची

मखाना भेळ बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात मंद आचेवर देशी तूप टाका आणि गरम करण्यासाठी ठेवा. कढईतील तूप वितळल्यावर त्यात शेंगदाणे घालून काही मिनिटे परतून घ्या. शेंगदाणे चांगले तळून झाल्यावर एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. आता कढईच्या तुपात मखाना टाकून 5-6 मिनिटे चांगले तळून घ्या. चवीनुसार तिखट आणि मीठ घालून परतावे. मखाने चांगले तळून झाल्यावर एका भांड्यात काढा.

आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात भाजलेले शेंगदाणे आणि मखाना टाका आणि चांगले मिसळा. याआधी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बीटरूट आणि गाजर यांचे बारीक तुकडे करून घ्या. त्यांना एका मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि सर्वकाही चांगले मिसळा. यानंतर त्यात चाट मसाला, हिरवी मसालेदार चटणी, गोड चिंचेची चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आता मखाना भेळ एका प्लेटमध्ये काढून त्यावर शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Chitra kode:

Related Stories

No stories found.