Mix Vegetable Soup : दिवसाची सुरुवात मिक्स व्हेजिटेबल सूपने करा, दिवसभर रहाल फ्रेश

Breakfast Recipe: तुम्हालाही मिक्स व्हेजिटेबल सूप आवडत असेल तर तुम्ही आमच्या रेसिपीच्या मदतीने ते घरी सहज बनवू शकता.
Mix Vegetable Soup
Mix Vegetable Soupsakal
Updated on

दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी मिक्स व्हेजिटेबल सूप हा एक उत्तम पर्याय आहे. मिक्स व्हेजिटेबल सूपमध्ये भरपूर पोषक तत्वही असतात. जर तुम्ही या वातावरणात ब्रेकफास्टमध्ये मिक्स व्हेजिटेबल सूप घेतले तर ते तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते.

बहुतेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी सूप प्यायला आवडते, परंतु जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता. जर तुम्हालाही मिक्स व्हेजिटेबल सूप आवडत असेल तर तुम्ही आमच्या रेसिपीच्या मदतीने ते घरी सहज बनवू शकता. चला जाणून घेऊया मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्याची सोपी पद्धत.

मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कांद्याची पात, - 2 चमचे गाजर चिरलेले - 1 बीन्स चिरलेली - 5-6 सिमला मिरची चिरलेली - 1/2 कोबी चिरलेली - 2-3 चमचे लसूण पाकळ्या - वाटाणे - 2 चमचे स्वीट कॉर्न - 2 चमचे मिक्स्ड हर्ब्स - 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स - 1/2 टीस्पून मिरपूड - 1/2 टीस्पून आले चिरून - 1 टेबलस्पून कॉर्न फ्लेक्स - 1 टीस्पून तेल - 3 टीस्पून मीठ - चवीनुसार

Mix Vegetable Soup
Oats Mini Uttapam Recipe : दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्यासाठी बनवा ओट्सचा मिनी उत्तप्पम

मिक्स व्हेजिटेबल सूप रेसिपी

मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी प्रथम गाजर, लसूण पाकळ्या, कांद्याची पात, कोबी यासह सर्व भाज्या एक-एक करून बारीक चिरून घ्या. यानंतर कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात लसूण, आले आणि कांद्याची पात घालून सर्व काही 1-2 मिनिटे परतून घ्या.

आता बारीक चिरलेले बीन्स, गाजर आणि सिमला मिरची टाका आणि सर्व साहित्य 1 मिनिट शिजवा. यानंतर बारीक चिरलेली कोबी, मटार आणि स्वीट कॉर्न घालून सर्व काही २ मिनिटे परतून घ्या. यानंतर 4 वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. 5 मिनिटे चांगले शिजवा.

भाज्या पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर, एका लहान भांड्यात 1 चमचे कॉर्न फ्लोअर ठेवा आणि त्यात थोडे कप पाणी घाला. ते व्यवस्थित मिसळा आणि हे सर्व सूपमध्ये घाला आणि सूप घट्ट होईपर्यंत 3-4 मिनिटे उकळवा. आता सूपमध्ये व्हिनेगर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. तुमचे मिक्स व्हेजिटेबल सूप तयार आहे.

Chitra kode:

Related Stories

No stories found.