तुमच्या घरातील लोक दुधी भोपळ्याची भाजी खात नाही, मग बनवा त्याचे धपाटे..

फळभाजी असलेला दुधी भोपळ्याची भाजी खायचा बराच लोकांना कंटाळा येतो...
recipe of dudhi bhopla dhapate
recipe of dudhi bhopla dhapate
Updated on
Summary

फळभाजी असलेला दुधी भोपळ्याची भाजी खायचा बराच लोकांना कंटाळा येतो.

फळभाजी असलेला दुधी भोपळ्याची भाजी खायचा बराच लोकांना कंटाळा येतो. पण दुधी भोपळा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो. मग अशा वेळी जर तुमच्या घरातील लोक दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तर तुम्ही दुधी भोपळ्याचे धपाटे करुन त्यांना ते खायला देऊ शकता. चला तर मग बघूया दुधी भोपळ्याचे धपाटे कसे करायचे तर... (recipe of dudhi bhopla dhapate)

recipe of dudhi bhopla dhapate
पावसाळ्याचा आनंद लुटा! कांद्याची पात घातलेलं असं वांग्याचं भरीत ट्राय करा

दुधी भोपळाचे धपाटे करण्यासाठी लागणारे साहित्य -

१) कोवळा दुधी भोपळा

२) दोन वाटी गव्हाचं पीठ

३) अर्धा वाटी बेसनपीठ

४) अर्धा वाटी ज्वारीचं पीठ

५) जिरं, तिळ ,ओवा

६) चवीनुसार तिखट, मीठ, हळद

७) बारीक चिरलेला कोथिंबीर

८) लसुण पेस्ट

कृती :

  • सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर तो कोरडा झाला की, सिलनीने दुधी भोपळयांचे साल काढून तो किसणीवर किसून घ्यावा .

  • नंतर किसलेला भोपळा मोठ्या परातीत टाकून त्यात चवीनुसार तिखट ,मीठ, हळद ,जिर, तिळ घालावे. नंतर हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे .

  • नंतर गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ एकत्र करुन भोपळ्याच्या मिश्रणात चांगल मळून घ्यावे. फक्त हे पीठ मळताना त्यात पाणी घालू नये. कारण किसलेला भोपळ्याला तिखटामिठांमुळे आपोआप पाणी सुटतं. त्या पाण्यात पिठ मळून घेतले धपाटे चवदार लागतात.

  • पीठ चांगलं मळलं की मग कोळपाटावर ओला कपडा टाकुन धपाटे तयार करून घावे. नंतर हे धपाटे हळुवार पणे तव्यावर टाकून खरपूस भाजून घ्यावे.

  • अशा पद्धतीने आपले धपाटे खायला तयार आहेत.

  • तुम्ही हे धपाटे दही ताक किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

recipe of dudhi bhopla dhapate
पावसाळ्यात गरमागरम खाण्याची इच्छा होतंय? ट्राय करा टेस्टी कोथिंबीर वडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.