राजस्थानी खस्ता पराठा करणं सहज शक्य; जाणून घ्या कृती

आता घरीच तयार करा खरपूस खस्ता पराठा!
राजस्थानी खस्ता पराठा करणं सहज शक्य; जाणून घ्या कृती
Updated on

पोळीला पर्याय म्हणून अनेक जण पराठ्याला पसंती देतात. काहींना प्लेन पराठा आवडतो. तर काहींना स्टफ पराठा. विशेष म्हणजे अनेक स्त्रिया मुलांच्या नावडतीच्या भाज्यादेखील पराठ्यामध्ये स्टफ करुन त्यांना खायला देतात. त्यामुळे अनेक घरांमध्ये पराठा हा विशेष लोकप्रिय आहे. साधारणपणे, आलू पराठा, गोबी पराठा, पनीर पराठा, चीज पराठा हे पराठ्यांचे काही लोकप्रिय प्रकार सगळ्यांना माहित असतील. परंतु, खस्ता पराठा कधी ट्राय केला आहे का? मूळ राजस्थानमधील फेमस असलेला हा पराठा अनेक ठिकाणी आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे हा लोकप्रिय पराठा घरी कसा करायचा ते जाणून घेऊयात. (recipe rajasthani khasta paratha)

राजस्थानी खस्ता पराठा करणं सहज शक्य; जाणून घ्या कृती
कोरोना काळात गरम पाणी पिताय? मग हे नक्की वाचा

साहित्य -

गव्हाचं पीठ - २ वाट्या

दही - २ चमचे

तेल - १ चमचा

मीठ, हळद, तिखट,हिंग, धणे-जीरे पूड,ओवा, मिरपूड - आवश्यकतेनुसार

कृती -

प्रथम एक मोठी वाटी घेऊन तेल घ्या. या तेलामध्ये वरील सर्व मसाले टाकून ते व्यवस्थित मिक्स करुन घ्या. त्यानंतर एका परातीमध्ये गव्हाचं पीठ, मीठ, तेल दही घालून पाण्याच्या सहाय्याने कणिक मळून घ्या. (दररोज पोळ्यांना ज्या पद्धतीची कणिक भिजवतो त्याच पद्धतीची ही कणिक मळा) १० मिनिटे ही कणिक झाकून ठेवा. त्यानंतर कणकेचे लहान लहान गोळे करुन घ्या. यातील एक गोळा घेऊन त्याची लहान पुरी लाटा व त्यावर तेलात कालवलेला मसाला पसरवून घ्या. त्यानंतर या पुरीची सुरळी करा. या सुरळीला चक्राकार (बाकरवडीप्रमाणे) आकार देत गोल करा व पुन्हा एकदा लाटण्याच्या सहाय्याने तिला लाट. या लहान पुरीला पराठ्याचा आकार येईपर्यंत ती लाटा व त्यानंतर खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()