Alu Vadi Recipe: पारंपरिक पध्दतीने अळूवडी कशी तयार करायची?

श्रावण महिना म्हटलं की अळू वडी आलीच...
Alu vadi recipe
Alu vadi recipeEsakal
Updated on

चला तर मग बघू या पारंपरिक पद्धतीने अळूच्या वड्या कशा तयार करायच्या त्या खास रेसिपी..

साहित्य:

● अळूची काळसर देठाची पाने

● बेसन दोन वाटी

● आले,लसूण,मिरची पेस्ट

● लाल तिखट

● हळद

● चवीपुरते मीठ

● चिमूटभर साखर

● गोडा मसाला

● खिसलेला गुळ

● चिंचेचा कोळ अर्धी वाटी

● धणेजिरे पावडर

● शेंगदाणा कूट

● खोबरं

● तीळ

Alu vadi recipe
Shravan Somvar Recipe: उपवासाचे रगडा पॅटीस कसे तयार करायचे?

कृती:

सर्वप्रथम वरचे सगळे साहित्य एका भांड्यात एकजीव करुन मिक्स करून घ्या. नंतर थोडसं कोमट पाणी घेऊन सैलसर मिश्रण भिजवून घ्यावे. नंतर परातीला उलटे करून स्वच्छ पुसून त्यावर अळूचे मोठे पान पाठच्या बाजूने पसरवून बेलण्याने त्याच्या शिरा दाबून घ्याव्या.

मिश्रण हाताने पूर्ण पानावर व्यवस्थित लावावे.

दुसरे पानही उलट्या बाजूने, पण आधीच्या पानाच्या टोकाच्या विरूद्ध दिशेने अशाप्रकारे पानावर ठेऊन त्या पानालाही मिश्रण व्यवस्थित लावा. अशा पध्दतीने एक उलट आणि एक सुलट पाने लावून घ्या.

सर्व पाने लावून झाल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूने मधल्या बाजूला अळूची लावलेली पाने अलगद दुमडा. परत उरलेल्या मिश्रणाचा हात ह्या दुमडलेल्या भागावर हलकेच लावा. त्यामुळे अळूरोल वळताना सर्व पाने व्यवस्थित चिकटून राहतील.हळूहळू करत अळूरोल खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे मस्तपैकी गोलाकार वळून किंवा दुमडून घ्या. वळताना मधेमधे मिश्रणाचा हात हलकेच फिरवत रहा.

एक रोल‌ वळून झाला की शेवटच्या टोकाला पण मिश्रणाचा हात लावून एकदम पसरट करायचे आणि थोडेसे वळलेल्या रोलच्या डाव्या-उजव्या बाजूला पण लावावे. उकड काढायचे पात्र धुवून पाणी घालून उकळत ठेवा. वरच्या भांड्याला थोडासा तेलाचा हात फिरवून अळूचे रोल/ सुरळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा तऱ्हेने ठेवा आणि पंधरा मिनिटे वाफवून घ्या.

अळू रोल थोडे थंड होऊ द्या आणि मग धारदार सुरीने मध्यम आकाराचे काप करून घ्या. नुस्ती वाफवलेली अळूवडीदेखील मस्त लागते हं.. आवडत असल्यास एखाद-दुसरी नक्की खा. तेल गरम करून एक-एक वडी सोडून छान शॅलो फ्राय करून घ्या. आवडत असल्यास तळत असताना थोडेसे तीळ वरून भुरभुरवा.

कधीकधी अळूवडीचे पदर सुटतात. म्हणून वडी नेहमी अलगद तळावी. मध्यम ते जास्त आचेवर तळावे. अशा तळलेल्या अळूवड्या मस्त कुरकुरीत होतात. काहींना कुरकुरीतपेक्षा जरा लुसलुशीत आवडते, त्यांनी जरा कमी वेळ तळून अळूवडी बाहेर काढा. तळलेल्या वड्या टिश्यूपेपरवर काढल्या की जास्तीचे तेल टिपले जाईल.‌ आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजे खवलेले खोबरे टाकून सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.