उपवास तर करायचा पण खाऊन पिऊन असा अनेकांचा नेम असणं सहाजिक आहे. कारण दिवसभर एनर्जी टिकवायची असते. अशावेळी पचायला सोपं पण तेवढंच एनर्जी देणारं असं काहीतरी खाणे उपयुक्त ठरते. उपवासाचे थालिपीठ, साबुदाण्याची खिचडी अन् बटाट्याची भाजी खाऊन बोर झाले असाल तर हा चविष्ट, हेल्दी आणि बनवायला ही सोपा असा पदार्थ नक्की ट्राय करून बघा.
बटाट्याचे अप्पे कसे बनवायचे जाणून घेऊया.
१ वाटी शिंगाड्याचे पीठ
२ मॅश केलेले बटाटे
अर्धा टीस्पून जिरे
५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ चमचे दही
पाणी
मीठ चवीनुसार
पीठ चाळून घ्या.
एका ताटात चाळलेले पीठ, उकडलेले बटाटे मॅश करून, जीरे, चिरलेल्या मिरच्या, दही सर्व आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिक्स करून घ्या.
नीट पेस्ट करा.
त्यात बेकींग सोडा आणि सेंधव मीठ घालून नीट हलवा.
१० मिनीटे झाकून ठेवा.
अप्पे पात्र गॅसवर गरम करा.
त्याला नीट तूप लावा.
मध्यम आचेवर अप्पे दोन्ही बाजूने नीट शेकून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.