Shravan Somvar Recipe: पहिल्या सोमवारला उपवासाला करा स्पेशल केळ्याची कचोरी

या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खायचं, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय.
केळ्याची कचोरी
केळ्याची कचोरी sakal
Updated on

श्रावण महिना सुरू झाला. हा श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित केला जातो. भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते, उपवास केला जातो. या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खायचं, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय. ( Shravan Somvar Recipe try kelyachi kachori or banana kachori recipe)

तुम्ही कधी उपवासाची कचोरी ट्राय केली का? चला तर स्पेशल केळ्याची कचोरी जाणून घेऊया.

केळ्याची कचोरी
Food Of Maharashtra : वाचा मिरची आणि कोकणच्या खाद्यसंस्कृतीचं कनेक्शन

केळ्याची कचोरीचे सहित्य :

पारीसाठी :

  • ३ ते ४ कच्ची केळी

  • १ ते २ वाटी राजगिरा/शिंगाडे/केळीचे पीठ

  • चवीनुसार मिठ

  • २ चमचे आले आणि हिरवी मीरची पेस्ट

सारणासाठी :

  • १ वाटी ओले खोबरे

  • मिठ चवीनुसार

  • साखर चवीनुसार

  • हिरव्या मिरचीचे तुकडे

  • सुकामेवा आवडीनुसार

  • तळण्यासाठी तेल किंवा तूप

केळ्याची कचोरी
Food recipes : घरच्या घरी बनवा मसाले भात, अगदी पंगतीत असतो तसाच...

कृती :

  • सर्वप्रथम कच्ची केळी सालासकट कुकरला लावून अर्धवट वाफवून घ्यावीत.

  • वाफवलेली केळी गार झाल्यावर त्याची साले काढून ती कुस्करून किंवा किसून घ्यावीत. नंतर त्यात उपासाला चालणारे कोणतेही पीठ, हिरवी मिरची वाटण, मिठ घालून त्याच्या पारी तयार करून घ्याव्यात.

  • सारणाकरिता ओल्या खोबऱ्यात मीठ, साखर, मिरचीचे तुकडे, सुकामेवा घालून एकत्र करून घ्या.

  • त्यानंतर पारीसाठी बनवलेल्या पिठातून एक गोळा घेत त्याची वाटी तयार करावी. तयार केलेल्या पिठाच्या वाटीत एक चमचा ओल्या खोबऱ्याचे सारण घालून ती हाताने वळून पारी बंद करावी.

  • अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या तयार करून घ्याव्यात. त्यानंतर या कचोऱ्या तेल किंवा तुपावर तळून अथवा शॅलोफ्राय करून घ्याव्यात. अशा प्रकारे गरमागरम केळ्याच्या कचोऱ्या तयार होतात. या कचोऱ्या तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

पाककृती लेखिका : पल्लवी आचार्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()