- सिद्धार्थ मल्होत्रा
सिद्धार्थ मल्होत्राला घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ आवडतात, तसेच इटालियन आणि जापनीज पद्धतीचे खाद्यपदार्थदेखील आवडतात. फिटनेसच्या बाबतीत सिद्धार्थ खूपच सजग आहे. तो ऑरगॅनिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतो. सकाळी नाश्त्याला अंडी किंवा स्वीट पोटॅटो आणि ग्लुटेन-फ्री ब्रेड हा त्याचा मेन्यू असतो. दुपारच्या जेवणात चिकन ब्रेड, हिरव्या पालेभाज्या- त्यातही पालकाचा जास्त वापर असतो; तसेच काही वेळा उकडलेले बटाट्यांवरही साहेब खूश असतात. ब्रोकोली त्याची आवडती भाजी आहे. रात्रीच्या जेवणात तो फक्त ग्रील्ड फिश खातो. दिवसातून तो फक्त तीन मिल्स घेतो. फळांऐवजी तो सुका मेवा खायला प्राधान्य देतो. त्याला बुलेट कॉफी आवडते- ज्यात ब्लॅक कॉफी आणि एक चमचा तूप असे कॉम्बिनेशन असते, तसेच मल्टिग्रेन भाकरी आणि त्यासोबत कोणतीही भाजी खायला त्याला आवडते. साखरेपेक्षा पदार्थांत गुळाचा वापर करणं योग्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं अन्न आणि घरी शिजवलेलं अन्न ही आपल्या उत्तम आरोग्याची ‘रेसिपी’ असल्याचे तो सांगतो.
सिद्धार्थची आई उत्तम स्वयंपाक करते. तिच्या हातचे पदार्थ त्याला अधिक आवडतात. काळे चने, हलवा आणि पुरी त्याची आवडती डिश आहे. याशिवाय गोड पदार्थांचा तो विशेष चाहता आहे. जिलेबी, हॉट चॉकलेट फज, डार्क चॉकलेट त्याला खायला आवडते. सिद्धार्थला ‘गुलाबजाम आणि लोणचे’ असे आगळेवेगळे आणि काहीसे विचित्र कॉम्बिनेशन पसंत आहे. याशिवाय सुशी, बिर्याणी, चिकन ग्रेवी विथ रोटी हा मेन्यू तो कधीही खाऊ शकतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगलिंग फेज असतो. सिद्धार्थही त्याला अपवाद नाही. ज्यावेळी सिद्धार्थ मुंबईत आला, त्यावेळी त्याच्या हातात फारसे चित्रपट नव्हते. तेव्हा तो स्वतःच स्वयंपाक बनवायचा. त्यात शक्यतो बॉइल्ड फूड आणि मोजकेच खाद्यपदार्थ त्याला करता यायचे. आता मात्र तो स्वयंपाकात चांगलाच पारंगत झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने बटर गार्लिक प्रॉन्स केले होते. त्याचा फोटोही त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. सिद्धार्थ हा दिल्लीतच लहानाचा मोठा झाला. त्याच्या मते, दिल्ली ही भारताची ‘फूड सिटी’ आहे. तेथील पुरी, चना, हलवा, पाणीपुरी, आलू टिक्की, चना चाट, राज कचोरी त्याची फेव्हरेट आहे. बंगालच्या स्वीटचाही तो चाहता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.